Skip to main content

आज काय घडले... फाल्गुन व. १२ पालखेडला निजामाचा कोंडमारा मराठ्यांची विजयप्राप्ती !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव शके १६५० च्या फाल्गुन व. १२ रोजी पहिल्या बाजीरावाने पालखेड येथे निजामाचा संपूर्ण मोड केला. या वेळी निजामुल्मुल्काने दक्षिणेत आपले बस्तान नीटपणे बसविले होते. दिल्लीच्या बादशहापासून दक्षिणच्या सहाहि सुभ्यांतून खंडणी घेण्याचा हक्क बाळाजीने मिळविला होता.

आज काय घडले... फाल्गुन व. ११ "बाई ! मला उन्हाळ करित्येस ?" शके १६७५ फाल्गुन व. ११ रोजी मल्हारराव होळकरांचे एकुलते एक पुत्र, प्रसिद्ध अहल्यादेवीचे पति खंडेराव होळकर यांचे निधन झाले.

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
अहिल्यादेवी होळकर खंडेराव यांचा जन्म शके १६४५ च्या विजयादशमीस झाला. खंडोबा हे होळकरांचे दैवत असल्यामुळे मल्हाररावांनी मुलाचे नांव खंडेराव असें ठेविलें. शके १६५५ मध्ये यांचे देवी अहल्येशी लग्न झाले. अहल्याबाई व खंडेराव यांच्यांत दुर्दैवाने असावे तेवढे सख्य नव्हते.

फाल्गुन व. ९ छत्रपति राजाराममहाराजांचे निधन

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... राजाराम महाराज शके १६२१ च्या फाल्गुन व. १ रोजी श्री शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव श्रीराजाराममहाराज यांचे निधन झाले. राजारामांचा जन्म शके १६६२ मध्ये सोयराबाईच्या पोटी झाला.

फाल्गुन व. ८ इंद्रजिताशी युद्ध सुरू ! फाल्गुन व.८ रोजी लक्ष्मणाचे आणि इंद्रजिताचे युद्ध सुरू होऊन इंद्रजिताचा वध झाला.

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... इंद्रजित निकुंमिलेकडे इंद्रजित यज्ञ करीत होता. इकडे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण, बिभीषण, हनुमान व जांबवान हे सर्व निकुंभिलेस आले. हनुमान आणि जांबवान यांनी इंद्रजिताच्या सैन्यावर निकराचा हल्ला केला. इंद्रजिताने आपले यज्ञकर्म सोडले व रथावर आरूढ होऊन त्याने मारुतीवर बाणाचा वर्षाव सुरूं केला.

आज काय घडले... फाल्गुन व.७ त्यांस ईश्वरें यश दिले !"

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन व.७ त्यांस ईश्वरें यश दिले !" शके १६९२ च्या फाल्गुन व.७ रोजी हैदर आणि मराठे यांच्यांत प्रसिद्ध मोतितलावाची लढाई होऊन हैदराचा प्रचंड पराभव झाला. माधवराव पेशव्यांचे सर्व लक्ष दक्षिणेकडील कर्नाटक प्रांती असे. कर्नाटकांत त्यांनी एकंदर पांच स्वाऱ्या केल्या; पैकी पहिल्या चार स्वारीतून ते स्वतः हजर होते. पानिपतचे संकट कोसळल्यावर मराठयांच्या सर्वच शत्रूंनी उचल खाल्ली. त्यांत हैदरअल्ली प्रमुख होता. त्याने एकामागून एक असे मराठ्यांचे प्रांत घेण्यास प्रारंभ केला. तेव्हां त्याचा बंदोबस्त करणे माधवरावांना क्रमप्राप्तच होते.

आज काय घडले... फाल्गुन व. ५ खऱ्यांचा प्रसिद्ध संग्राम !

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
madhavrav peshve शके १७१६ च्या फाल्गुन व. ५ रोजी म्हणजे रंगपंचमीला मराठे आणि निजाम यांचा खर्डे येथे इतिहासप्रसिद्ध सामना होऊन निजामाचा संपूर्ण पराभव झाला. मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा हा प्रसंग आहे. खासा विजय अजूनहि मराठ्यांच्या बाहूंना स्फुरण चढवीत असतो.

फाल्गुन व. ४ वि. ना. मंडलीक यांचा जन्म!

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
mandlikआज काय घडले... फाल्गुन व. ४ वि. ना. मंडलीक यांचा जन्म! शके १७५४ च्या फाल्गुन व. ४ या दिवशी अव्वल इंग्रजीतील सुप्रसिद्ध सार्वजनिक कार्यकर्ते विश्वनाथ नारायण मंडलीक यांचा जन्म झाला. यांचे जन्मस्थान मुरूड.

आज काय घडले... फाल्गुन व. ३ " श्रीशिवाजी राजे शिवनेरीस उपजले!"

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
shivjanmआज काय घडले... फाल्गुन व. ३ " श्रीशिवाजी राजे शिवनेरीस उपजले!" शके १५५१ च्या फाल्गुन व. ३ रोजी शिवनेरी येथे स्वराज्यसंस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांचा जन्म झाला. निजामशाहीत मराठ्यांची दोन घराणी प्रसिद्धीस आली : एक भोसल्यांचे व दुसरें जाधवांचें. पैकी शहाजी भोसले आपल्या पराक्रमाने सर्वत्र तळपत राहिले.

आज काय घडले... फाल्गुन व|| २ "आतां मज जाणे प्राणेश्वरासवें !" शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजी महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकाराम महाराज यांचे निर्याण झाले.

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 10/04/2021 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन व|| २ "आतां मज जाणे प्राणेश्वरासवें !" शके १५७१ च्या फाल्गुन व. २ रोजी महाराष्ट्रांतील विख्यात सत्पुरुष तुकाराम महाराज यांचे निर्याण झाले. संसारांत संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रवण असलेले तुकाराम महाराज परमेश्वराकडे संपूर्ण वळले. कीर्तनकारांच्या पाठीमागे ध्रुपद धरून तुकोबांरायांनी " कांही पाठ केली संतांची उत्तरें.” भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन ज्ञानदेव-एकनाथांच्या वाङ्मयाचे वाचन सुरू केल्यावर त्यांचे चित्त निर्मळ झाले. थोड्याच दिवसांत गुरुकृपा होऊन त्यांना कवित्वाची स्फूर्ति झाली.