लेखकहेमंतकुमारयांनी सोमवार, 12/04/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष फाडून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते.
लेखकपाटिलयांनी सोमवार, 12/04/2021 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो.
मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. काहीही लक्षणं नव्हती तरीही सल्ल्यानुसार प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नसलेली व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही.
लेखकवामन देशमुखयांनी रविवार, 11/04/2021 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
बग़ारा ख़ाना आणि कद्दू का दालचा ही पाककृती मला खूप दिवसांपासून मिपावर लिहायची होती. शेवटी आज मुहूर्त लागला.
हैद्राबादी खाद्यसंस्कृती ही बहुविध आहे. हिंदू-मुस्लिम पाककृतींचा, पदार्थांचा, खाद्यशैलींचा एकमेकांवर खूप प्रभाव आहे. बग़ारा ख़ाना खरंतर टिपिकल मुस्लिम पदार्थ आहे, पण हिंदू समारंभातही- अगदी गणेशोत्सव, बोनालू, बतुकम्मा इ प्रसंगीच्या सार्वजनिक भंडाऱ्यांत, लग्न-कार्य अश्या प्रसंगी हमखास केला जातो.
बग़ारा ख़ान्यासोबत कद्दू का दालचा, मिरची का सालन किंवा बैंगन का सालन हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. नेहमीच्या जेवणात दालचा आणि विशेष प्रसंगी सालन असा सर्वसाधारणपणे बेत असतो.
लेखकपाषाणभेदयांनी रविवार, 11/04/2021 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग १:
http://www.misalpav.com/node/48651 ::: आवाज बंद सोसायटी - भाग १
आवाज बंद सोसायटी - भाग १
विषय प्रवेश
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात.
लेखकपाषाणभेदयांनी शनिवार, 10/04/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'.
ध्वनी प्रदूषण
तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.
माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता.
लेखकमदनबाणयांनी शनिवार, 10/04/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला...
लेखकअमर विश्वासयांनी शनिवार, 10/04/2021 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भागात म्युच्युअल फंड चे विविध प्रकार पहाणार आहोत. उदाहरण म्हणून या लेखात काही स्कीम्स चा उल्लेख येईल. ह्या स्कीम्स माझ्या अनुभवरून मी वेळोवेळी गुंतवणुकीसाठी वापरल्या आहेत. तरीहि गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा
____________________________________________________________________________________________________
सर्वप्रथम म्युच्युअल फंडाबद्दलच्या काही महत्वाच्या संज्ञा
१. Entry & Exit load : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही शुल्क भरावे लागले तर त्याला entry load म्हणतात. बहुतेक सर्व स्कीम्स मध्ये entry load शून्य असते.
लेखकAshutosh badaveयांनी शनिवार, 10/04/2021 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले...
फाल्गुन व. १३
चितोडचे सौभाग्य गेलें!
शके १४९० च्या फाल्गुन वद्य १३ रोजी सम्राट अकबर बादशहा याने रजपुतांचा प्रचंड पराभव करून चितोडगड आपल्या ताब्यांत आणला.
त्या वेळी चित्तोडच्या राज्यावर उदयसिंह राणा होता. अकबर बादशहाने वयांत आल्यावर साम्राज्य-विस्तारास सुरुवात केली होती. आपल्या बापास संकटकाळी ज्यांनी मदत केली नाही त्यांना अकबराने वठणीवर आणले. अनेक रजपूत राजे त्याचे मांडलिक बनले. पण चितोडगडावर जोपर्यंत केशरी आदित्यध्वज फडकत आहे तोपर्यंत अकबराला समाधान नव्हते. मेवाडचा राणा उदयसिंह अकबराचे स्वामित्व कबूल करीत नव्हता.