मनातला राम
मनातला राम
आज रामनवमी ! सगळयांच्या स्टेटस पासून फेसबुक च्या भिंती पर्यंत सगळीकडे रामराया भरून उरलाय . मी कधीच कुठल्या देवाचे फोटो शेअर करत नाही . अशा प्रचन्ड गर्दीच्या दिवशी तर देवळात जावं असं मनात देखील येत नाही . पण आज फेसबुक वर , व्हाट्स अँप वर रामावरच्या लेखांचा पूर आलाय . काही वाचले काही सोडून दिले . त्यातच एक तुळशीबागेतील रामाच्या देवळाचा फोटो आणि छोटासा लेख वाचला .
तुळशीबागेतील हे रामाचं देऊळ माझं खरंच आवडतं . एक सारसबागेतील तळ्यातला गणपती आणि दुसरा हा राम मला मनापासून आवडतात . तुळशीबाग म्हटलं तरी डोळ्यासमोर फक्त गर्दी येते .
मिसळपाव