Skip to main content

subprime crisis.. (कोसळलेला) पत्त्याचा बंगला

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 18/03/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण कॅलिफॉर्निया मधला ऒरेंज प्रांत. कर्जाचे हप्ते न भरल्यान एका कुटुंबाला राहत्या घरातून बाहेर पडावं लागंल , तेही ऐन नाताळच्या तोंडावर . शेवटच्या दिवशी "no trespassing" ची पाटी लावायला आलेल्या महिला पोलीस अधिकारयाला त्या कुटुंबातल्या ४-५ वर्षाच्या मुलाने विचारले.." how will Santa ever find me now ? ".. यावर डोळ्यातून अश्रु वाहण्या पलीकडे कोणाच्याही हातात काही नव्हतं. अशीच परिस्थीती " subprime mortgage crisis " मधे अडकलेल्या व बेघर झालेल्या हजारो अमेरीकन कुटुंबांची आहे.. सीनबीसीच्या " house of cards " या विशेष वृत्तांता मधे या घोटाळ्याच उत्तरीय परीक्षण केलय.

गमतीशीर देवपुजा

लेखक रम्या यांनी बुधवार, 18/03/2009 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो... लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे.

फ्लॉवर-मटार करंज्या.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 18/03/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/४ किलो फ्लॉवर बारीक चिरुन. १/४ किलो मटार मोहरी तेल तिखट हळद मीठ कोथिंबिर भरपूर ओला नारळ अर्धी वाटी कणीक ३ वाट्या बेसन १ वाटी जीरं १ टी स्पून कृती: कढईत २ टेबलस्पून तेल तापवून फोडणीला मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे.

घड्याळ

लेखक जागु यांनी बुधवार, 18/03/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
जोराने एवढ्या ओरडू नकोस थोडावेळ थांब उशिरा झोपले रात्री , अंगाला चढलाय आम टक टक तुझी सदा चालू असते जग सारे तुझ्याभोवती घुटमळत असते. २४ तास तुझे न चुकता जागतोस अर्ध्या पेक्षा जास्त त्यात आम्हालाच राबवतोस. ऑफीस चालू बंद करण्याची तुझ्यात असते ताकद आम्हाला मात्र सुट्टीची मोजावी लागते किंमत. नको तेव्हाच कधीतरी बंद पडतोस आणि कामाचा सगळ्या बट्याबोळ करतोस. जन्मा पासुन मरणा पर्यंत तुझा असतो सहवास एखाद दिवस नसशील तर दिवस होतो भकास.
Taxonomy upgrade extras

मनोमन प्रार्थना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 18/03/2009 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
"कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं." जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्षं कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.कुणा आजार्‍याला भेटण्यासाठी किंवा माझ्या डॉक्टर मित्राला सांगून कुणातरी माझ्या नातेवाईकाला ह्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्याच्या निमीत्ताने माझ्या इकडे बर्‍याच खेपा व्हायच्या.

तुझ्या दु:खाविना

लेखक शिवापा यांनी बुधवार, 18/03/2009 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन किती वेळ जाईल? तुझी आठवण कुठपर्यंत राहिल? तु गेलायेस पण आठवण छळतेय तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच हे सर्व दु:खांचे हेहि संपेल पर्व आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना आठवणीची सारी भुते जळतांना हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी अश्रुही तरळणार नाहि तुझी आठवण तेव्हांहि येईल पण तुझ्या दु:खाविना

शास्त्रीय प्रयोग - मदत हवी

लेखक वेलदोडा यांनी मंगळवार, 17/03/2009 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, खालील शास्त्रीय प्रयोग करण्यास मदत हवी आहे. शेवटच्या क्षणी बहीणीच्या मुलाने विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याचे ठरवले. भाच्याला प्रयोग करण्याकरीता काही उमेदवार मिळाले. पण तरीही संख्या खूप कमी आहे. (जेमतेम १०-१२) . जर मिपाकरांनी खालील प्रमाणे चाचण्या घेऊन आपली निरिक्षणे नोंदवली तर प्रयोगासाठी खूप मदत होईल. प्रयोग - खाली दिलेल्या चित्रातील रंग ओळखून प्रत्येक चाचणी देण्यासाठी किती वेळ लागतो , चाचणी देणार्‍याचे वय आणि स्त्री कि पुरूष हे नमूद करायचे आहे. शब्दांचा फक्त रंग ओळखायचा आहे. शब्द वाचायचे नाहीत. रंग मोठ्याने म्हणायचे.

आनंद यादवांचा राजीनामा...

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 17/03/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
'कलेचे कातडे' पांघरुन सुद्धा 'संतसूर्या'ने चटका दिला 'माउली'शीच घेता 'झोंबी' वारकर्‍यांनी झटका दिला.