Skip to main content

गुढी उभारावी अशी

लेखक राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारावी अशी
एक उभी केली काठी त्य़ाला बांधली गोड गाठी निंबाचा उघळा वर तांब्याची लोटी दर वर्षी आपण अशी पारंपारीक गुढी उभारतो पण थोर पुरुषांनी अशा अमर गुढ्या उभारल्या भक्तीची गुढी तुकारामांनी ज्ञानाची गुढी ज्ञानेश्वरांनी गिता संदेशाची गुढी कृष्णांनी शांतीची गुढी बुध्दांनी महाराष्ट्राची गुढी शिवरायांनी समतेची गुढी ज्योतिबांनी सत्य अहिंसेची गुढी गांधीनी देश भक्तीची गुढी सावरकर, भगतसिंगांनी स्वच्छतेची गुढी गाडगेबाबांनी शिक्षणाची गुढी कर्मवीर अण्णांनी मला वाटते मोठे काम करणे म्हणजेच गुढी उभारणे होय आपण सुध्द
Taxonomy upgrade extras

वर्तमानात राहाण्याचा फायदा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 27/03/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
"अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं." किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं.मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो.गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती. गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते.

माजी विद्यार्थी मेळावा.... असाही!

लेखक अडाणि यांनी शुक्रवार, 27/03/2009 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात घरी फोन आला... 'उद्या माजी विद्यार्थी मेळावा आहे शाळेत. सध्याकाळी ५ वाजता शाळेच्या पटांगणात. जरूर या.' कुटुंबातील दोन पिढ्या शाळेत बालवाडी ते दहावी पर्यंत शिकलेल्या असल्याने आमंत्रणाचा विशेष आनंद झाला. उशीरा आमंत्रण दीले असले तरी काही हरकत नाही. जुने शिक्षक भेटतील आणि शाळेतील सोबती भेटतील ह्या आनंदात बाकी सर्व गोष्टी आम्ही विसरून गेलो. ठरल्या वेळेवर (अंमळ जरा आधीच...) आम्ही शाळेत पोचलो... पुण्यातील शिवाजीनगरची 'भारत इंग्लिश स्कूल' ही अस्मादीकांची बालपणची कर्तूत्वभूमी !!! नाव इंग्लिश असले तरी संपूर्ण शाळा मराठीतच चालायची.

दमलो बुवा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/03/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
जरा कुठे पाच सहा-तास ऑफलाईन असावं आणि येऊन पाहावं तर किमान ५/६ तरी नवे लेख, कविता आणि त्याला प्रत्येकी किमान ३०-३५ प्रतिसाद आलेले पाहायला मिळातात! अरे यार पब्लिकला एवढं लिहायला आणि ते वाचकांना ते वाचून प्रतिसाद लिवायला टाईम तरी केव्हा भेटतो तेच समजत नाय! :) आम्ही हे सगळं केव्हा वाचणार, केव्हा प्रतिसाद देणार, ते काय समजत नाय बा! छ्या, हल्ली मिपाचं हे चित्र पाहूनच 'दमलो बुवा!' असं म्हणायची वेळ येते! :) असो.. आपला, (दिवसेंदिवस कामधंद्यात पार गुरफटत चाललेला!) तात्या.

पसारा

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 27/03/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ती यांची सुंदर रचना शहारा किती पाळणे हलून गेले अता थांबबा... थकून गेले रंगामध्ये आले मी अन- कुठे अचानक उठून गेले? घरात डोकावले; दचकले कुणी कडे मी चुकून गेले! अजून खाटेवरी पसारा कुणी इथे बागडून गेले जमेलसे वाटलेच नव्हते हळूहळू मग जमून गेले... काल मला ती काय म्हणाली? "काम तुझ्यावीन घडून गेले" सदर्‍याला का गंध निराळा कोण पाखरू बसून गेले? पती जरासा सुंभ निघाला लग्ना दिवशी पळून गेले! श्वासांची येरझार "केश्या"- खरे काय ते कळून गेले?

तुझं घर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 26/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांची पाखरं उडतील वार्‍यावर दाही दिशांत फिरून शोधतील तुझं घर तुझ्या अंगणी विसावा घेतील ती क्षणभर माझ्यासाठी आणतील तुझ्या गाण्यातले सूर माझ्या आशेचा पाऊस बरसेल झरझर ओल्या मातीच्या गंधाने धुंदावेल तुझं घर मोती थेंबांचे सांडेल तुझ्यासाठी फुलांवर माझ्यासाठी आणील तो तुझा प्राजक्तबहर माझ्या स्वप्नांचे काजवे जागतील रात्रभर उजळेल तुझं घर, तुला दिसेल समोर उभा अंगणी मोहक चांदण्यांचा गुल्मोहर माझ्यासाठी झळाळेल तुझ्या हास्याचे झुंबर माझ्या कल्पनेचा वारा माझा धरून पदर मला संगती नेईल दाखवाया तुझं घर मंद शीळ घालून तो उघडील तुझं दार माझ्यासाठी आणील तो ............तुलाच माझ्यासमोर!
Taxonomy upgrade extras