Skip to main content

`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 01/04/2009 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
akshay1 अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं. मुंबईच्या लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला.

मिसळपावची जडण घडण !

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 01/04/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं मिसळपाव वापरायला जास्तीत जास्त सोप्पं आणि सुरेख करण्याचं ठरलेलं आहे. ह्या कामात मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्‍या मिपाकरांना या धाग्यावर मिसळपाव बद्दल अपेक्षा, बदल आणि वेगवेगळ्या संरचना सुचवण्याबद्दल आवाहण करीत आहोत. मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं? ते अधीक चांगलं कसं करता येईल? मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं नाही? ते बरोबर कसं करता येईल? मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का? रोजच्या काळात मिसळपाववर वावरतांना काय अश्या बाबी आहेत की ज्या अधीक चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत?

कॉनफिकर - १ एप्रिलचा महा-झटका !

लेखक दशानन यांनी बुधवार, 01/04/2009 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
कॉनफिकर हा एक वायरस असून ह्यांने आता पर्यंत १ करोड वीस लाखाच्या वर संगणकांवर हल्ला केला आहे, ह्याला अश्या पध्दतीने कोड केला गेला आहे की हा स्वतःच १ एप्रिल ला कार्यरत होतो व आपले काम चालू करतो, अजून पर्यंत हे कळाले नाही आहे की हा कार्य कसे करतो डायरेक्ट हल्ला करतो की हळू हळू करतो हे अजून समजले नाही आहे, हा आपल्या संगणकावर पुर्ण ताबा मिळवतो व आपल्या सर्वर वरुन आलेल्या आदेशांचे ( कमांन्डचे) पालन करतो. ह्याचा उद्देश तुमच्या संगणकाला त्रास देण व तुमची गोपनिय माहीती चोरणे ह्यासाठी केला जातो / जात आहे.

गाडीच्या गाडीवाना...

लेखक डॉ. आनंदा वारके यांनी बुधवार, 01/04/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या गाडीचा गा बैल बैलापाठी नक्षाची झुल तुज्या गाडीचं गा चाक चाक धावतया एकटाक गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ चाळ वाजत्यात खुळखुळ तुज्या कपाळाचा गा घाम घाम देतोया दाम गाडीच्या गाडीवाना गाडी चालली माळराना S S S
Taxonomy upgrade extras

नर्सरी

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
कालच माझ्या मुलीचा नर्सरीतील निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने नर्सरीच्या शिक्षकांनी मिळून मुलांचे काही नाच, कविता, गाणी बोलण्याचे कार्यक्रम ठेवले होते. नाच शिक्षकांनीच मुलांकडून बसवून घेतले होते. रितसर मुलांना खाऊ दिला. काही उत्सुक पालकांनी सगळ्या पालकांकडून पैसे जमा करून शाळे करीता भेट वस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संचालक शिक्षिकेने आम्हा पालकांना काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करायला सांगितले. सगळ्या पालकांच्या वतिने मी बोलण्याचे ठरविले आणि फक्त त्यांचे आभार मानले. पण मनात थोडी खंत राहीली की अजुन मी माझे नर्सरी बद्दल मत मांडायला हवे होते.

पहिली भेट

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते तुला भेट आपली पहिली पहिल्या भेटीतली गुपिते पहिली हवे तर विचार त्या लाटांना रोजच येतात त्या किनार्‍याच्या भेटीला सुर्यही तुझी वाट पाहत रेंगाळला होता तू आलेला पाहुन निर्धास्त मावळला होता यायला तुला खुप उशिरच झाला होता पण तुझ्या आगमनात अपराधी भावच नव्हता माझा रागही मी तेंव्हा व्यक्त केला नव्हता जवळून तुला न्याहाळण्याचा धिरही होत नव्हता बसलो होतो आपण ज्या दगडावर, विचार त्याला माझा थरथरता देह त्यानेच सावरला होता विचार त्या घोंघावत्या वार्‍याला तो ही सांगेल माझी ती ओशाळली स्थिती जेंव्हा तू हात माझा धरलास बांगडी पाहण्यासाठी दुरावा दुर करण्याचे तुझेही ते होते निमित्त पण तुझ्यात हरवले होते तेंव्ह
Taxonomy upgrade extras