Skip to main content

जोडीदार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 11/05/2021 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक सूचना - सध्याच्या काळात , नकारात्मक , कोरोनाची पार्श्वभूमी असलेलं लेखन वाचू नये असं वाटू शकतं . त्यांनी कृपया ही कथा वाचू नये . ---------- जोडीदार --------- रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं . एकटं पडल्यासारखं वाटत होतं . पश्याचा फोन आला . लय जुना रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं . आणि मग डोकं फिरलं !... त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही .

विनोद ...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 11/05/2021 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या धाग्याचा उद्देश, फक्त हसणे आणि हसवणे, इतपतच आहे. मी वाचलेले काही विनोद देतो... -------------- "येथे हवा भरून मिळेल...!!" लेखक - डॉ. आर. डी. कुलकर्णी. काही वर्षापूर्वी माझ्या दवाखान्यात घडलेला मजेदार किस्सा. एक दिवस दुपारी दवाखाना बंद करण्याच्या वेळेला, साधारण मध्यमवयीन दिसणारा रुग्ण माझ्याकडे आला. त्याला अधून मधून चक्कर यायची असं त्यानं सांगितलं. तपासणी करत असताना त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारून मी त्याचा रक्तदाब पाहायला लागलो. तो जरा गोंधळल्यासारखा झाला आणि म्हणू लागला की “डाक्टर साहेब, मी लई गरीब माणूस हाये.

लाँकडाऊन

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/05/2021 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकातील विसाव्या वर्षात लाँकडाऊन हा जुना सर्व सामान्यानां माहीती नसलेला शब्द प्रयोग बोलचालीचा झाला आणि घाटावरच्या " विसाव्या " चे वारंवार दर्शन घडवून गेला. आता "विसावा ", या शब्दाची एवढी भीती बसली आहे की चुकनही कोणी त्याचा उपयोग केला तर अंगावर काटे येतात. अशाच एका कडक लाँकडाऊन च्या दिवशी घरी बसुन कंटाळलो होतो म्हटंल चला जरा फेर फटका मारुन यावा. मी स्वताः बाहेर पडलो का नाही कारण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. पडू म्हणले तरी घरी बायको, मुले काँलोनीतले मीत्र, सिक्युरिटी स्टाफ आणी रोड वर पोलिसांचा कडक बंदोबस्त.करोनाची भीती ती वेगळीच.......

गोष्ट एका सुजलाम सुफलाम जंगलाची

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 10/05/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील प्राण्यांचा व घटनांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तिंशी व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंध नाही. यात वर्णिलेल्या घटनांचा जर सद्य किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांशी काही जरी संबंध आढळला तर तो किव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती) पूर्व, पश्चिम, उत्तर ते दक्षिण असे प्रचंड विस्तारलेले एक जंगल होत. गोड्या पाण्यांनी काठोकाठ भरलेली तळी, सुपीक जमीन, बारमाही वाहणार्‍या नद्या यांनी तो प्रदेश सुजलाम सुफलाम बनला होता. विविध प्रकारचे प्राणी त्यात गुण्यागोविंदाने रहात होते.

अपवाद

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 09/05/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.

एक स्फुट... (निसर्ग आणि माझी पुस्तके)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 09/05/2021 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्फुट... (निसर्ग आणि माझी पुस्तके) ....मी लहान असताना पहिले अनुवादीत पुस्तक वाचले ते ‘‘मोहॉकची रणदुंदुभी’’. लेखक (मराठी अनुवादक) आठवत नाही. अमेरिकेतील मोहॉकच्या खोऱ्यात गोऱ्यांनी जी वसाहत केली त्याच्या पार्श्र्वभूमीवरील ही कादंबरी... त्या वेळी तरी मला फार आवडली ती. त्यातील निसर्गासाठी. चांगली जाडजूड होती. The Drums of Mohwak ही इंग्रजी कादंबरी मात्र नेटवर कुठेतरी उपलब्ध आहे. मी एक दोन वर्सांपूर्वी याचा अनुवादही करायला घेतला होता. पण नंतर तो अर्धवट राहिला. त्यातील काही भाग खाली देत आहे.. एक तरूण जोडपे वसाहत करण्यासाठी निघालेले असते त्यांची ही गोष्ट आहे...

फॅक्टर इन्व्हेस्टिंग ... गुंतवणुकीचा एक वेगळा मार्ग

लेखक अमर विश्वास यांनी शनिवार, 08/05/2021 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ... म्युच्युअल फंडावर लिहिताना मला १२ वर्षांचा अनुभव होता. फॅक्टर इन्व्हेस्टिंग ही माझ्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे हे "संकल्पना" (Concept) य स्वरूपात आहे. मिपा वरच्या तज्ञ आणि अनुभवी लोकांचे प्रतिसाद मला या स्ट्रॅटेजी मध्ये मदत करतील म्हणूनच हा लेखनप्रपंच _____________________________________________________________________________________________________________________________ सुरुवात ......

मादाम मेरी क्यूरी...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 08/05/2021 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मादाम मेरी क्यूरी... ( काही शास्त्रीय शब्दांची मोडतोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही केवळ एक आदरांजली समजावी) Simple, Free Image and File Hosting at MediaFire .....हे वर्ष तसे महत्त्वाचे आहे. या वर्षी मेरी क्यूरीला नोबेल पुरस्कार मिळून १०० वर्षे पूर्ण झाली. १९११ साली रेडियम आणि पोलोनियम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला.