Skip to main content

चला लेखक होउया !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 11/04/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- आमचे कार्यालय वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ? पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी. मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ? आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे. मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता.

जालिंदर जलालाबादी यांच्या भक्तांसाठी खुश खबर. त्वरा करा.

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 11/04/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य' जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच. आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत. लॉकेट ५००० रु फोटोफ्रेम १००० रु पेन २०० रु टी शर्ट ९०० रु (जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर. जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु भक्तांनी संपर्क साधावा.

राग मारवा - माहिती हवी आहे

लेखक अनुप कोहळे यांनी शनिवार, 11/04/2009 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, नमस्कार! काल रत्री पंडित जसराज ह्यांचा राग मारवा ऐकत होतो. फारच धिर गंभीर राग आहे. कुणाला ह्या रागा ची माहिती असल्यास मिळू शकेल काय? मला आरोह अवरोह आणि ईतर माहिती हवी आहे. लिंक असली तरीही चालेल. धन्यवाद! अ. को.

जालिंदर महिमा

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 10/04/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी सगळीकडे जालिंदर बाबा चमत्कारी यांची माया (स्त्री नव्हे) नाना रुपात प्रकट होत आहे. त्यांची भक्तगण संख्या सुद्धा वाढत आहे. यापासुन मी तरी किती दिवस वंचित राहणार होतो.
Taxonomy upgrade extras

शर्यत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा तुझी काळजी वाटते मला. तु म्हणतेस की बराच शांत झालो आहे. खरे तर खुप अस्वस्थ आहे. लग्नानंतरचे १ ले वर्ष सोडले तर तु स्वःतला मुलाभोवती केंद्रीत केलेस. तुझ्या आयुष्याच्या वर्तुळाचा केंद्रबिंदु होता तो. अर्थात बाकीच्या जबाबदार्‍या पण समर्थपणे पेलल्यास. बायको, सुन, काकी, मामी, मावशी ही नाती सांभाळताना कुठेही कमी पडली नाहीस. सर्व कुटुंबात तुझा उदो उदो आहे. ही कर्तव्य पार पाडताना कुठे गुंतली नाहीस. माझ्यात सुद्धा नाही. अर्थात त्या बाबत आज माझी काहीही तक्रार नाही. फारसे सख्य नसलेल्या जावेच्या नातीत गुंतायला का लागली आहेस? तुम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी कशा काय होत आहात? का चाहुल लागली आहे तुला

(बुरुंडीतला जालिंदर) - विडंबन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
(आधार : दिव्यातला राक्षस ) आणखी एक जाळिंदरली मिसळपावावरती वावरतांना, जुना प्रसिद्ध दुवा मिळाला काळजीपुर्वक बघता दुव्यामधुनी जालिंदरजी हो निघाला लिही लिही लिही.... पिवळे हास्य करुन म्हणाला बोल मेरे बगलबच्चे, कोण बनवू तुला फुटकळ लेखक कधीच झालो शोधतो संस्थळात नव्या कंपुला कंपु शोधणे झाले मुश्किल 'जाज' जी, आता तुमचा हवाला बेरकी हसले, हळुच म्हणाले ले(ख)को, जुना जमाना गेला असते जर सोपे शोधणे आजकाल प्रामाणिक कंपुला गुरु तुझा हा असा असता का अफ़्रिकातील बुरुंडीत राहीला मुंबै, पुणे नाहीतर गेलाबाजार एखादा ठा

पाववाल्याचे गाणे

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 10/04/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक खूप गरीब माणूस सायकलवरुन पाव (ब्रेड) विकत असे. टोकाच्या गरीबीमुळे त्याच्याकडील पाव ठेवण्याची पिशवी अगदी फाटलेली असते व त्यातुन पाव जमीनीवर कधी पडून जात हे त्याला बिचाऱ्याला सायकल चालवतांना कळतही नसे. त्याची दया येऊन एकजण त्याला एक नवी कोरीकरकरीत पिशवी देतो. त्यामुळे त्यापिशवीतुन पाव घेऊन विकतांना साहजिकच त्याचे नुकसान टळते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो- "आज कल पाव जमींपर नही पडते मेरे".. असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!

पुढील टप्पा--IIM अहमदाबाद

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 10/04/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला आपणास कळवायला अत्यंत आनंद होत आहे की मला जून २००९ मध्ये सुरू होणार्‍या अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (IIM Ahmedabad) या संस्थेच्या प्रबंधनातील पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाला आहे.निकाल थोड्या वेळापूर्वी जाहिर झाला.माझा अभ्यासक्रम जून महिन्यात सुरू होईल आणि त्यापुढील दोन वर्षे चालेल.दरम्यानच्या काळात मिपावर कधी आणि किती वेळा येणे होईल हे सांगता येत नाही तरीही मिपा हेच माझे आंतरजालावरील मराठी घर असेल यात मला कसलीच शंका वाटत नाही. मी या लेखात म्हटल्याप्रमाणे चांगला निकाल लागताच मिपावर जाहिर करत आहे.