चला लेखक होउया !
स्थळ :- आमचे कार्यालय
वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ?
पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी.
मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ?
आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे.
मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता.
मिसळपाव