Skip to main content

लाल भोपळ्याची बाखर भाजी

लेखक रेवती यांनी मंगळवार, 23/06/2009 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: लाल भोपळा अर्धा किलो, मूठभर तूरडाळ भिजवलेली, अर्धा छोटा चमचा मेथीदाणे, किसलेले सुके खोबरे भाजून कुस्करून अर्धा ते पाऊण टे.स्पू.,कच्च्या चारोळ्यांची भरड पूड अर्धा टे. स्पू., खसखस भाजून कुटलेली अर्धा टे. स्पू., लाल तिखट, मीठ व गूळ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, पाव वाटी गरम पाणी, फोडणीचे सामान, थोडी कोथिंबीर चिरून. कृती: साले काढून लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी कराव्यात. कढई गरम झाल्यावर त्यात छोटा डाव तेल घालावे. मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करावी. त्यातच मेथीदाणे घलावेत. ते तांबूस झाल्यावर आता भिजलेली तूरडाळ घालून बोटचेपी शिजवावी. यानंतर भोपळ्याच्या फोडी घालून ढवळावे.

झटपट बॅचलर पिझ्झा

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 23/06/2009 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
छोट्या डॉनने पिझ्झा हटमधे घालवलेल्या संध्याकाळवर टाकलेला लेख वाचला आणि माझी पिझ्झा खायची इच्छा जागृत झाली. वाढत्या वजनामुळे लई दिवसांपासून पिझ्झा खाणे बंद केलेले आहे. विकतच्या पिझ्झ्यात एकतर भरपूर कॅलरीज असतात, शिवाय मैद्याचा बेस म्हणजे भरीत भर! तरी अधे-मधे कधी लहर आलीच तर विकतच्या पिझ्झ्याला पर्याय म्हणून एका बॅचलर पिझ्झ्याला बर्‍याच दिवसांपुर्वी जन्म दिलेला होता... तोच आज करायचा ठरवला. याची चव ही विकतच्या पिझ्झ्याच्या जवळचीच, कॅलरीज् पण कमी... आणि अगदी लवकर व कमी कष्टात होणारा आहे हा पिझ्झा! पिझ्झ्यासाठी काय लागतं? जास्त काही नाही...

Summer Job

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 23/06/2009 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
3

-: माझे कौलारू घर :-

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 22/06/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
-: माझे कौलारू घर :-

खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||
Taxonomy upgrade extras

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 22/06/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

रंक आणि राजा

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/06/2009 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१.धंदा करायची इच्छा बाळगर्‍याला आमंत्रण लागत नाही. गुडद्यात ताकद असली की पुरे. २. बँकेकडुन थोडे कर्ज घेतले की तो कर्ज घेणार्‍याचा त्रास असतो. भरपुर घेतले तर तो त्रास कर्ज देणार्‍या बॅकेचा असतो. ___________________________________________________________ नोकरीचा खूप कंटाळा आला. खणखणीत पगार, जेवणखाण, इतर सेवा मोफत असुनसुद्धा. असंख्य वेळा तेच तेच बोलुन अक्षरशः वैतागलेलो होतो. लोकांच्या 'टाइम्ज , मोशन, अ‍ॅक्शन 'चे प्रश्न संपायचेच नाहीत. दर दहा पेशंट मागे ४ जण 'वेळ' वाढवायच्या विनंती घेउन यायचे. ७ दिवसाच्या नोटीस ने नोकरी सोडली. साहेब वैतागला. 'स्टार बॅट्समन' रीटायर होणार होता.

कोकण दौरा

लेखक नानबा यांनी सोमवार, 22/06/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण दौरा मी आणि माझे काही मित्र कोकणात दौर्‍यावर गेलो होतो. त्या वेळी मी माझ्या कॅमेर्‍यातून टिपलेला कोकणाची काही छायाचित्रे मी इथे टाकत आहे... आपणही त्याचा आनंद घ्याल....