Skip to main content

..पट्टराणी..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 20/09/2009 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
..पट्टराणी.. ------------ करु नको माझ्याकडे तु गं अशी पाठ राणी.. सोडु का ग सांग तुझ्या चोळीची मी गाठ राणी.. जीव होतो कासावीस,तू गं अशी रुसताच.. पहा माझ्याकडे आणि हास ना ग एकदाच.. तुझ्या कुशीमध्ये पुरी सरु दे गं रात राणी... राग इतुका गे आला,वर धरीला अबोला.. रात विरहात जाई शिक्षा तुला आणि मला.. बोल ना ग माझ्याशी तु..बिलगुनि घट्ट राणी... गुंफु दे गं हातामध्ये माझ्या तुझे दोन्ही हात भिडु दे गं ओठालाही तुझे मधाचे गं ओठं.. लागु दे गं सुर आता..धुंद सप्तकात राणी... दिस तर जातो जसा..रात नको विरहात.. मिठीतुनि पाहु दे ना..मंद कोवळी पहाट.. वाटे मग मी गं राजा..तु गं माझी पट्टराणी.. ------------ योगेशु
काव्यरस

`एनर्जी' आणि `टॉनिक'!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 20/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते. ... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते.

"गोडसे" असे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते?

लेखक सुनील यांनी रविवार, 20/09/2009 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
"गोडसे" असे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते? १) एखादा गोड पदार्थ २) तुमचा आवडता गोड पाळीव प्राणी ३) मुग्धा गोडसे सुचना - वर उल्लेखलेल्या तीन पर्यायांव्यतिरीक्त अन्य पर्याय उपलब्ध नाहीत याची कृपया नोंद घ्यावी आणि धागा अवांतराकडे भरकटणार नाही याची काळजी घ्यावी! स्वग

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/09/2009 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?) लोकांचे एका ओळीच्या कौलांची संख्या व गुणवत्ता बघून मला पण कौलं काढायची हौस झाली. त्यामूळे मी खालील आगामी कौलं माझ्या नावे राखून ठेवत आहे. गरजू कौल लेखक खालील एक एक कौल त्यांच्या एकास एक लेखाच्या बदल्यात माझ्याकडून मागून घेवू शकतात. गरजूंनी या पत्यावर संपर्क साधावा. (आमच्या येथे पाहिजे तसे कौलं पाडून मिळतील. किंमत व्यक्तिपरत्वे/ स्थान परत्वे बदलेले. महाराष्ट्रीय रहिवाश्यांना खास सवलत. त्वरा करा.) १) कौलाचे अनेकवचन काय?

संगोपन आणि आत्मनिर्णय.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 19/09/2009 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र रघुनाथ खाडिलकर अगदी सुरवातीपासून बेफिकीर वृत्तिचा पण तोलूनमोजून निर्णय घेणारा असा होता.काल त्याची आणि माझी गाठ एका सायन्स सेमिनारमधे पडली. "अरे,परत तू ह्या विषयात भाग घ्यायला सुरवात कशी केलीस.तू तर सर्व सोडून जवळ जवळ संन्यास घेतलास असं मला मागे भेटला होतास त्यावेळी म्हणाला होतास ते मला आठवलं.सोन्यासारखी कंपनी सोडून तू कसलंच काम न करण्याचा विचार केला होतास.ज्या कंपनीत तू होतास तिला वर यायला तू खूपच मेहनत घेतली होतीस.तुझ्या कर्तुत्वाच्या जोरावर सि.इ.ऒ.झालास म्हणून माझाच एक मित्र तुझा विषय निघाला त्यावेळी तुझी स्तुती करून सांगत होता.तुझं काही खरं नाही बाबा." रघुनाथला काहीच बोलायला न

बिलगलेल्या कविता

लेखक सुनिल पाटकर यांनी शनिवार, 19/09/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
बिलगलेल्या कविता कवितांचे आणि आपले नातं तसं अगदी घट्ट..लहानपणी आईच्या कडेवर बसून एक घास काऊचा आपल्या पोटात जातो ,तो या कवितेच्या सोबतीनं..अडगुल-मडगुल गुणगुणणा-या आईच्या तोंडाकडे बाळही कसं टकमक बघत रहातं..ही कवितेची ओढ नाहीतर काय ?.अनेक पावसाळे पाहिलेत असा दाखला देणारे आपण आयुष्यातील पहिल्या पावसाचं स्वागत येरे येरे पावसा असं गुणगुणत करतोच ना ! बड्बड गाणी, बालगीतं मोठमोठ्यानं म्हटल्या शिवाय अक्षरांशी गट्टी कुणाची जमली का ?.

"मिलर ऑफ द डी"

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 19/09/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर. कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी "चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला, वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी?
काव्यरस

(बोध....!)

लेखक मराठमोळा यांनी शनिवार, 19/09/2009 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा !!!!बोध!!! आळश्यांच्या साम्राज्यावर मॉर्निंग वॉकचा तोरा ट्रेडमील उभी कोपर्‍यात डंबबेल करताहेत मुजरा चौकाचौकात उभे हृदयविकार, रक्तदाबाचे दुत आणी आसमंत सारा प्रदुषणाने झाकोळलेला मी कुणाला विचारु निरोगी आयुष्याचा रस्ता इथे प्रत्येक जण विकारांनी पिळवटलेला कधीचा औषधे घेतोय आणी डॉक्टर नेहेमीच गोंधळलेला पैसे कमवा स्पर्धेत मी देहाची किंमत विकलेला. आपला मराठमोळा.

आजारी कोण, `टॉनिक' कुणाला...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 19/09/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र हे संपन्न राज्य आहे. मुंबईसारख्या महानगरांनी तर प्रगतीच्या जागतिक स्पर्धेत उडी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे. नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्र जगाच्या औद्योगिक नकाशावरदेखील अव्वल स्थान मिळवील आणि देशाचे औद्योगिक नेतृत्व करील, असे अभिमानाने सांगितले जाते. ... पण "सार्वजनिक आरोग्या'वर या संपन्नतेच्या खाणाखुणा दिसत नसल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मात्र "खुरटलेले'च आहे. मुंबईसारख्या महानगरांवर संपन्नतेची सूज चढत असतानाच, मेळघाटातल्या आदिवासींची मुले मात्र कुपोषणाने मृत्यूला कवटाळत आहेत.