Skip to main content

०१०२२०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 01/02/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ फेब्रुवारी २०१०. म्हणजेच ०१०२२०१० ... उलट सुलट कशीही वाचा तारिख तीच. आहे ना जादू? :) जाताजाता: इंग्रजी भाषेत असे दोन्ही बाजूंनी सारखेच असणार्‍या शब्दसमूहांना पॅलिन्ड्रोम म्हणतात. काही उदाहरणं... nitin malayalam Able was I 'ere I saw Elba - Napoleon Dammit, I'm mad चीमा काय कामाची अजून काही आहेत का माहिती?

मनात माझ्या...

लेखक अजिंक्य यांनी सोमवार, 01/02/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या विचार आले, अफाट वेगामधे पळाले, कुठून आले, कुठे निघाले, कळे न काही... मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... मनात माझ्या अनेक वाटा, दिशादिशांना अनेक लाटा, जिथे बघावे नवीन फाटा, कळे न काही... मनात माझ्या विचार आले, सुसाट वेगे नभी उडाले, विहार केला, उडून गेले, कळे न काही...

बाप

लेखक मिसंदीप यांनी सोमवार, 01/02/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी "बाप" नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो कोणाकडे असल्यास कृपया sanbed@gmail.com वर पाठवावा ..हि विनंती.

(लिहावे कुठे)

लेखक चेतन यांनी सोमवार, 01/02/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
जयवी ताईंची सुंदर 'रुतावे कुठे' गझल वाचली आणि विडंबनाची कंड जाणवली ;) माझा एक प्रयत्न न कवीस कळले लिहावे कुठे कविता कुठे अन् चर्चा कुठे उशाला ठेवली रात्री पुस्तके तरी घुसते का ज्ञान डोक्यामध्ये कुठे ठरवुनी जमावे अश्रु लोचनी मालिका बघुनी रडावे कुठे मनी वंचना, हास्य गालावरी अशा बोलण्याने फसावे कुठे पुरस्कार पाहुनी थकलो अता नव्या 'पद्मा' ची पातळी कुठे हिमेशी नाक चोंदले का कधी नाकातुनी गाणे ऍकवावे कुठे सुरा पिउनी चालवणे गुन्हा किती निष्पाप ही मारावे कुठे विडंबनाने कोपला कवी जर का विडंबकाने मग पळावे कुठे चेतन

उर्मिला धनगर विजयी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 01/02/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
झी च्या सारेगमप स्पर्धेमधे उर्मिला धनगर विजयी..... महागायिका उर्मिला धनगर हिचे हार्दिक अभिनंदन......... :P :P :P :P :P

रुतावे कुठे

लेखक जयवी यांनी सोमवार, 01/02/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
न काट्‌यास कळले सलावे कुठे रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे विषाला अता या उतारा नको कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे बरसता जमावे तळे लोचनी असे पापण्यांनी झरावे कुठे उरी वेदना, हास्य गालावरी अशा सोसण्याचे पुरावे कुठे तिरस्कार झेलून थकलो अता अशा गुंतण्याचे निभावे कुठे तुझे चांदणे गोंदले या नभी निशेच्या नशेने वहावे कुठे सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे अवेळी कसा लोपला सूर्य हा रित्या अंबराने लपावे कुठे जयश्री अंबासकर

रांगोळी

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीचा दिवस. माझं देवघर अगदी छान सजलेलं. देवासमोर बसून नवरा साग्रसंगीत पूजा करतोय. त्याच्या मागे छोट्याछोट्या आसनांवर मुलं बसली आहेत...किंवा शांत बसून रहायचा प्रयत्न करताहेत. मुलीचं लक्ष तिच्या चमचमत्या घागर्‍याकडे अन हातातल्या हैद्राबादी बांगड्यांकडे आहे तर मुलगा त्याच्या चुडीदार कुर्त्यावरची... म्हणजे त्याच्या भाषेत 'शाहरूख खान ड्रेसवरची' नक्षी निरखून बघतोय. नाकातली नथ नि अंगावरची पैठणी सावरत माझीही लगबग सुरू आहे. पूजा आटोपली तशी नवर्‍यानं प्रसादाचं ताट आणायची खूण केली.

माझं गाडीपुराण

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षांपूर्वी, नवर्‍याचं अमेरिकेला 'सह' यायचं नक्की झालं नि तर्‍हेतर्‍हेच्या शेर्‍यांना, सल्ल्यांना जणू ऊत आला. 'नशीब काढलं हो पोरीनं...' ( म्हणजे? भारतात संसार करणारे सगळे फुटक्या नशिबाचे की काय?) 'आता काय, मज्जाच मज्जा तुमची...तिथे सारी कामं रोबोट करतात म्हणे.( हा रोबोट म्हणजे मीच हे इथे आल्यावरच कळलं.) 'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्‍याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले) 'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?) 'हं... तशीही तिला नटायमुरडायची आवड... आता काय..

...म्हणून सासू ही 'आई' होऊ शकत नाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/01/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला. त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का! सासू ही आई होऊ शकत नाही, कारण... १. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्‍यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही. २. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते. ३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते. ४. या वयात हॉस्पिटलच्या वार्‍या नि खर्च परवडणारा नसतो. ५.

माझी अगतीकता

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/01/2010 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...