शाल्मली...
शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं...
"शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे...
मिसळपाव