भिकारी
सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता.
मिसळपाव