Skip to main content

माहेराची आटवण येई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
माहेराची आटवण येई
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ|| बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका पुढं जाई मागं येई चुके काळजाचा ठोका पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई झोक्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||१|| भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||२|| बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी जिंकाया
काव्यरस

पाऊस एक रा* आहे. :)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 26/07/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला पाऊस खूप आवडतो. :) (चला शाळेतल्या निबंधासारखी सुरुवात झाली). पूर्वी पुण्यात जेव्हा वाड्यात रहायचो तेव्हा पावसाळ्यात १-२ कौले फुटली असतील तर तिथून पाणी गळायचे. तेव्हा आई त्या खाली बादली लावून ठेवायची. तेव्हाच्या वाड्यांमधे कॉर्पोरेशनचे पाणि दिवसातून २ दा २ तास येत असे. त्यामुळे त्यावेळात दिवसभराचे वापरायचे पाणी भरून ठेवायला लागायचे. तेव्हा पावसाळ्यात अशा साठवलेल्या पाण्यामुळे पाण्याची ऐश असायची. एखाद्या ठिकाणी कौल थोडंच फुटलं असेल तर तिथे त्याखाली फरशीवर नुसतं फरशीपुसणं टाकून ठेवायची. मी मस्त वाड्याच्या गॅलरीत (किंवा सज्जात) उभाराहून कौलावर तडाडणारा पाऊस ऐकत उभा रहायचो.

लो कॅलरी चिकन बिर्याणी...

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 26/07/2010 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
लो कॅलरी चिकन बिर्याणी... साहीत्यः चिकनः २ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन ३ मोठे चमचे दही मसाले: २ चमचे गरम मसाला १ चमचा हळद ३ चमचे तिखट २ तेजपत्ते ८-१० मिरे ४-५ लवंगा ३ चमचे आले-लसूण पेस्ट १ चमचा धणे पावडर अर्धा चमचा शाहीजीरे ३-४ वेलची १-२ मोठ्या वेलच्या २-३ काड्या दालचीनी खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल... ३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट... भातः २ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून न

आपण मराठी लोक

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 26/07/2010 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली. आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे. काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो.

माझे बाबा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/07/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बाबा
बंडू म्हणाला माझे बाबा ताकदवान ऑफीसात सारे झुकवतात मान राम म्हणाला माझे बाबा आहेत मस्त ४ डिश भेळपुरी करतात फस्त शाम म्हणाला माझे बाबा करतात मस्ती मातीमधली जिंकतात कुस्ती खंडू म्हणाला माझे बाबा शेतकरी शेतात जावून उसाला पाणी भरी राणी म्हणाला माझे बाबा गॅरेजमधे जातात स्कुटर कारचे ऑपरेशन करतात चित्रा म्हणाली माझे बाबा डॉक्टर पण नाटकात असतात अ‍ॅक्टर सुंदर म्हणाला माझे बाबा आहेत बिल्डर क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट फिल्डर चिनू म्हणाला माझे बाबा शाळेत शिक्षक लेख कविता नाटकांचे करतात परिक्षण गणू रडत

संस्कार देणारी बोटे

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 26/07/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल गुरु पौर्णिमा ..मात्र काल मिपा बंद असल्याने हा लेख प्रकाशित करु शकलो नाही .. तो आज प्रकाशित करत आहे . मिपाच नव रुप अत्यंत सुंदर आहे . या नव्या रुपात हा लेख लिहायला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे .म्हणुनच प्रचंड कष्ट करुन हे सर्व उभे करणार्‍या मिपा नवनिर्माण समितीला हा लेख अर्पण ..- विनायक गुरु पौर्णिमा आली .. ती सालाबादप्रमाणे येते .. आणि मग मीही नियमितपणे पेपरमधले लेख वाचतो … शिक्षकाना नमस्कार करतो ..विचार करतो .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मला आवडते .

या मुल्कात हे काय चालू आहे?

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 26/07/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखातील मजकूर हा आक्षेपार्ह असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केल्यवरून मजकूर अप्रकाशित करण्यात येत आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी - संपादक मंडळ नितिन थत्ते यांचे स्पष्टीकरण माझ्या जालीय आयुष्यात मी कुणाची बदनामी केली नाही. जे वाक्य आक्षेपार्ह वाटले तेथेही * चिह्न देऊन तळटीप लिहिली होती. (*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).

आजोळ

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 26/07/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली. रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही.

नवनिर्माण सूचना.

लेखक सरपंच यांनी रविवार, 25/07/2010 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव नवीन स्वरूपात सादर करतांना आनंद होतो आहे. मुख्य तांत्रीक बदलानंतर आज मिपा नव्या दमाने पुढे जायला तयार आहे. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की मिसळपावच्या ह्या नवीन रूपातील काही दोष आढळल्यास ते येथे या धाग्यावर लिहावेत. मिसळपावच्या स्वरूपाबद्दल केवळ येथेच चर्चा व्हावी ही विनंती. जे आवडलं त्याचे कौतुक आणि जे राहून गेलंय त्याची आठवण आणि ते पुर्ण होई पर्यंत त्याचा पाठपुरावा. हे सर्व येथे व्हावं. आता मुख्य काम झाल्यामुळे अधिकाधीक नवीन सोई देण्याकडे कल असेल. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे. - सरपंच