Skip to main content

विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 29/07/2010 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
राजेशशेठचे बट डोईवरी वाचले आणि आम्हाला पी‌. सावळारामांची आठवण आली त्यांची एकसे एक सुमधुर गाणी ऐकत असतानाच विलासरावांची परदेशवारी आमच्या वाचनात आली आणि आम्ही गाऊ लागलो विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला तिला भेटण्याला गेला, तिला भेटण्याला वेबकॅमी लावुनि डोळा अधी त्याने कुटले टाळ परदेशी नाही गेला कधी ही तो एक वेळ गावा कडे धंदा त्याचा भाऊ करे प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ लागली हो ब्राझीलाला सत्य वाचा त्याची कथा वाटली का तुम्हा खोटी फुकटचे चार टीन झोप लागे भली मोठी बियरच जन्माची ती शेजार्‍यास उठवू किती संपवून प्रवासास येई प्लेन जमिनीला -केसुरंगा क्रमशः

ती स्वप्नसुंदरी

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 29/07/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
ती स्वप्नसुंदरी सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी जोपासतो अशी ही आम्ही समानता राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी जोडे सजावटीला एसी-कपाट ते भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका भैरू अजून खातो कांदा नि भाकरी जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी खेड्याकडून जावे शहराकडे जसे आकार घटत चोळी, जाते सरासरी शेती करून मालक होणेच मुर्खता सन्मान मोल आहे कर अभय चाकरी गंगाधर मुटे ………………………………….……

स्पष्टीकरण

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 29/07/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या http://www.misalpav.com/node/13353 या धाग्यावरील मजकूर आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारी आल्याच्या कारणाने अप्रकाशित केला गेला होता. परंतु सदस्यांचे माझ्यावर टीका करणारे प्रतिसाद मात्र अप्रकाशित झाले नव्हते. त्यामुळे माझी कोंडी झाली होती. म्हणून संपादक मंडळाला आणि बिपिन कार्यकर्ते यांना विनंती केली असता माझे पुढील प्रमाणे म्हणणे त्या धाग्यावर प्रकाशित केले गेले आहे. परंतु मागे गेलेला धागा वर मात्र आला नाही त्यामुळे माझे आता नव्याने प्रसिद्ध झालेले म्हणणे सदस्यांपर्यंत पोहोचू शकले नाही.

फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 29/07/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा! आपण सगळेच आपल्या "तिरंगी" ध्वजाचे अभिमानी आहोत. जेंव्हां मी आपला ध्वज उलटा लावलेला पहातो तेंव्हां माझं तर रक्तच उसळतं! एक अनुभव माझा स्वतःचा! साधारणतः सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत परिषद संपल्यावर एक 'ओली' मेजवानी देण्यात येते व त्यात परिषदेत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतलेला असतो त्या त्या देशांचे ध्वज एका विशाल फलकावर लावले जातात. एकदा जर्मनीतील अशाच एका परिषदेत माझ्यासारखे इतरही भारतीय प्रतिनिधी असल्याने आपला तिरंगी ध्वज लावला होता, पण (बहुदा) अज्ञानामुळे उलटा लावलेला होता (हिरवी पट्टी वर ठेऊन).

रेसीपी हवी आहे... रबडी / बासुंदी

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी गुरुवार, 29/07/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिर्घकाळ टिकाऊ दुधा (long life milk) पासुन किंवा टिनबंद आटिव दुधापासुन (condenced milk) बासुंदी बनवता येते का? कशी बनवायची?

पिण्याचे पाणी -एक समस्या

लेखक बद्दु यांनी गुरुवार, 29/07/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पाण्यावरून धुमशान सुरू आहे. नळाचे पाणी (टॅप वाटर) विरुद्ध बाटलीबंद पाणी . आमच्या इकडे (आखाती वाळवंटात) बाटलीबंद पाण्याचा जास्त वापर आहे. त्यातही काही जणांनी घरी पाणी शुद्ध करण्याचे महागडे (किंमत सुमारे ३५,००० रुपये) यंत्र (वाटर प्युरिफायर)लावले आहे. त्यांचे म्हणणे हे की बाटलीबंद पाण्यापेक्षा असे शुद्ध केलेले पाणी आरोग्यास जास्त चांगले. कारण त्यातील विरघळलेले क्षार ( टी. डी. एस. – Total Dissolved Solids) चे प्रमाण बाटलीबंद पाण्यापेक्षा कमी आहे. प्रत्यक्षात WHO च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे टी. डी. एस. चे प्रमाण ५०० मिलि प्रती १००० लिटर (500 ppm) असायला हरकत नाही.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 29/07/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

सिगरेट सोडायची आहे?

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/07/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही सदस्यानी विचारणा केली होती त्यांच्या साठी म्हणून हे निवेदन : सिगरेट किंवा कोणतेही व्यसन हे माणसाच्या मेंदूशी दोन प्रकारे जोडलेले असते. कालांतराने व्यसन ही सवय बनते कोणतेही व्यसन हे केवळ निर्धार करून सुटत नाही. अथवा व्यसनापासून पळून जाऊनही सुटत नाही.. व्यसन आणि आपली विचारप्रणाली यांच्यात एक अनुबंध ( लिन्क) तयार झालेली असते जेणेकरून व्यसनाचे पदार्थ घेतले की ठरावीक विचार मनात येतात किंवा ठरावीक विचार मनात आले की व्यसनाची तल्लफ येते. व्यसनाची आणि विचारांची ही लिंक तोडता आली तर व्यसन सुटू शकते. सिगरेट सोडवून देण्यासाठी मी एन एल पी चा ,श्वसनाचे एक्सरसाईज,आणि मेडीटेशनचा वापर करतो.

मोरपीस

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 29/07/2010 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा पहिला दिवस. नवी वह्या पुस्तके घेऊन सायकल दामटत शाळेत पोचलो. आमच्या शाळेत प्रत्येक यत्तेचा आणि तुकडीचा वर्ग ठरलेला असायचा, त्यामुळे वर्ग शोधण्याचा प्रश्न नव्हताच. सायकल स्टँडला अडकवून वर्गात गेलो. रिवाजाप्रमाणे भिंतीकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर भिंतीच्या कोपर्‍यात देव्या बसलेला होता. त्याच्यापुढे रित्या आणि आडसुळ. मुलींकडच्या रांगेत शेवटच्या बेंचवर वैभ्या आणि विक्या बसलेले आणि त्यांच्या पुढच्या बेंचवर किशोर आणि अम्या. देव्याच्या शेजारची माझी जागा. नेहमीप्रमाणे चार बेंचचं कॅसलिंग जमलेलं पाहून समाधान वाटलं. जागेवर जाऊन बसलो तेव्हा आधीच चर्चा रंगात आलेली होती.