Skip to main content

माझा एक मित्र हरवलाय

लेखक अनुप्रिया यांनी रविवार, 22/08/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया आंतरजालीय आथवा प्रत्यक्ष मैत्रीचा ह्या कवितेशी काहीही संबंध जोडू नये माझा एक मित्र हरवलाय मीच घातलेल्या पसा-यात एकदा चालत होतो रस्त्याने घालून हातात हात मधे खड्डा, खड्ड्यात मी हातातून सुटलेला हात इतकच आठवतय मला त्यानंतर दिसलाच नाही परत माहीत आहे मला आहे तो इथेच माझ्या आसपास पहातोय मला टपो-या डोळ्यांनी हसतोय गालातल्या गालात देतेय हा friendship band ---------XXXXXXXX------- त्याच्यासाठी म्हणाव रूसू नकोस ये परत परत नाही रे करणार असं नाही सोडून जाणार हात वाट पहातेय तुझी मी तुला तुझीच मैत्री परत करण्यासाठी !!! - सोनाली

इच्छा

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी रविवार, 22/08/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांची सोनेरी किरणे कष्टांच्या दवबिंदूवर पडू दे. त्यातून उज्ज्वल यशाचे इंद्रधनु दिसू दे. कल्पनांच्या सागरी लाटावर स्वैरपणे स्वार होवू दे. त्यातून निसर्गाचे अनेक पैलू उलगडू दे. जिज्ञासेच्या पावसात नेहमीचं चिंब भिजून जाऊ दे. मनाच्या उत्तुंग भरारीला अगदी आकाशही कमी पडू दे. असेच काही माझ्या हातून घडुन जाऊ दे. त्या यशाने मायबापांच्या कष्टाचे पांग फेडू दे. अंतर्मनातील सुगंध गुलाबपरी सार्‍या आसमंतात दरवळू दे. ज्योतीप्रमाणे अखंड कार्य करण्याची सुबुद्धी लाभू दे. प्रेमाच्या व माणूसकीच्या प्रकाशाने सारे जग दिपून जाऊ दे. काय मागू तुजजवळ देवा... जे आहे त्यातचं समाधानी असू दे.

लपंडाव

लेखक kalyani B यांनी रविवार, 22/08/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
देवा..... जिथ जाईल तिथ तुझ अस्तित्व आहे. तुला चुकवून लपाव ही माझी वेडी आशा आहे. म्हणूनच देवा तस करण्यासाठी मी गोठ्यात जाऊन लपलो, तर ३३ कोटी देव घेऊन गाय मला बघत होती... घरात जाऊन लपलो तर , माझी माय मला बघत होती... जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ अस्तित्व होत... जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ रुप मला हसत होत... म्हणूनच देवा मी हा लपंडाव सोडला आहे. तुझ अस्तित्व माझ्यासाठी प्रेमाचा आधार आहे...

मी लिहीलेले उखाणे- संग्रह

लेखक सिंधू वडाळकर यांनी रविवार, 22/08/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझे नांव- सिंधू वडाळकर. राहाणार- मालेगांव वय-६६ संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही. आता मुलींची लग्ने झाली. थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते... तेव्हा मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा. जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच. मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण. १९७५ च्या आसपासचा काळ.
काव्यरस

बंध माळेचे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 22/08/2010 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
बंध माळेचे डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तस म्हटलं तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला, आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फ़क्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासु सुनेची स्वयंपाक घरातील आवरासावर संपली, की पूर्ण घर निस्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करण्यात कशी वेगळीच अनुभुती यायची. रविवारी घरातील सगळे उगाचच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे.