Skip to main content

बापं

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी सोमवार, 23/08/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रागाने फटकारलं, तरी नंतर समजूत काढणाराही तोचं असतो. त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी share करता याव्या असा best friend ही तोचं असतो. आपल्या वाईट संगतीबद्दल रागावणारा तोच असतो. पण चांगल्या friends सोबत जाण्याची मोकळीक देणाराही तोचं असतो. अपयशात धीर देऊन नवीन उमेद जागवणाराही तोचं असतो. आणि यशाच्या आनंदात आपल्या बरोबर नाचणाराही तोच असतो. आपल्याला स्वावलंबी व सक्षम बनवण्यास प्रयत्नशील असणाराही तोचं असतो. स्वतः उपाशी राहून आपल्याला जेवू घालणाराही तोचं असतो. जरी त्याला आईसारखी माया दाखवता येत नसली तरी मुलांच्या काळजीने पोखरला जाणाराही तोचं असतो. मुलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले, तर मुलांचे
काव्यरस

गणित (पक्कं)

लेखक प्रा.विद्याधर घैसास यांनी सोमवार, 23/08/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
गणित माझं पक्कं आहे. देण्यातले भागाकार ,घेण्यातले गुणाकार अधिक उण्यांचा हा व्यवहार , नित्य करतो निर्विकार. बेरजेत मी तरबेज आहे वजाबाकीत मी हात्चा आहे अधिक उण्याच्याच्या या व्यवहारात , मी मोठा लुच्चा आहे . गणिताकडून अगणिताकडे , जाण्याची मनी आस आहे विश्वरुपी कोड्याच्या , उत्तराचा ध्यास आहे. गणित जमलं उत्तर जमलं , ताळा काही जमेचना व्यवहारातला हत्च्चा , या गणितात रमेचना. ईश्वराच्या अस्तित्वाचं , गणित मग मांडून पाहीलं गुणाकार भागाकार अन् घनमुळाने , त्याचं मूळ शोधू पाहिलं . घननिळाचं घनफळ , गणितात त्या मावेचना भक्तीनं भरलेलं माझं मन , मन गणितात रमेचना.

शिवनेरीवर....महाराजांच्या जन्मस्थळी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 23/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज घाटात जाउन आलो. तिथून येतांना सीतेवाडी-गणेशखिंड मार्गे १९ किमी असलेल्या जुन्नरला आलो. गणेशखिंडीतूनच दिसणारा शिवनेरी आता त्याच्या कोरीव लेण्यांसह पूर्णपणे समोरच उभा ठाकला होता. शिवनेरी....एक बळकट, बुलंद, अभेद्य किल्ला....जवळजवळ २००० उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहीलेला, सातवाहनांचे राजकुल अंगाखांद्यावर मिरवणारा. नंतर चालुक्य, राष्ट्र्कूट, यादव अश्या राजवटी पाहिलेला नंतर मात्र ३०० वर्षांच्या काळरात्रीत झाकोळून गेलेला. एका दिवशी हळूच भोसल्यांचे सुनेचे, जाधवरावांच्या लेकीचे पाउल गडावर पडले.

खासदारांनी "सार्वजनिक सेवे'बद्दलचा मोबदला हक्काने मागितला आहे; परंतु त्याबरोबर येणाऱ्या उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय?

लेखक शेलार मामा मालुसरे यांनी सोमवार, 23/08/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांनी "सार्वजनिक सेवे'बद्दलचा मोबदला हक्काने मागितला आहे; परंतु त्याबरोबर येणाऱ्या उत्तरदायित्वाचे बंधन स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे काय? आपल्या यच्चयावत खासदारांनी आपल्या भुकेचे जे "दर्शन' गेले काही दिवस घडविले, ते अभूतपूर्वच म्हटले पाहिजे. सोळा हजारांवरून थेट ऐंशी हजार रुपयांपर्यंत वेतनाची मागणी त्यांनी केली. भुकेलेल्यांची फार मोठी संख्या असलेल्या देशातील आपण लोकप्रतिनिधी आहोत, याची जाणीव असल्याचेच त्यांनी त्यातून दाखवून दिले आहे, असे म्हणायला हरकत नाही. सचिवांना ८० हजार रुपये वेतन असेल, तर आम्हाला ८० हजार एक रुपये वेतन हवेच, असा त्यांचा आग्रह होता.

लोकबिरादरी प्रकल्प

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 23/08/2010 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः खालील लेख माझा नाही. लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्य सर्वांसमोर यावे ह्या हेतूने मी श्री. अनिकेत आमटे यांची पूर्वपरवानगी घेउनच हा लेख मिसळपाववर टाकत आहे. लोक बिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात OPD ची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ४.३० अशी असते. प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांना सकाळी ६ वाजताच तपासले जाते. दिवसा, रात्री-बेरात्री येणाऱ्या अत्त्यावस्थ रुग्णांना तात्काळ सेवा पण तितक्याच तत्परतेने दिली जाते.

विकांताची खादाडी : वाटाण्याच्या अक्षता..आपल हे..वाटाण्याची चटणी !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 23/08/2010 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : भरुन ठेवा..सॉरी सॉरी...ज्यांना वाटाणे आवडतात पण मटर-पणीर किंवा आलु-मटर खाताना चपातीतुन सटकतात अशी तक्रार असणार्‍या सर्व वाटाणे लव्हर्सना आमच्यातर्फे दिस पाकृभेट !! साहित्य : अर्थातच वाटाणे,लसुण मोहरी, मिरच्या, कांदे, टमाटे, तेल, तवा, कढई, पळी ई.ई. कृती : सर्वात पहिले वाटाणे तेलकट तव्यावर भाजुन घ्या.जास्त भाजायचे नाही. त्यानंतर मिरची+मोहरी+लसुण ह्यांना एकत्र कुटा, आमच्या कडे मिक्सर नाही वगैरै बहाणे चालणार नाहीत, सरळ ग्लास घ्यायचा आणी लाटण्याने कुटायला सुरुवात केली.

L1-B विजा

लेखक नि३ यांनी सोमवार, 23/08/2010 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, आमच्या कंपनी ने आम्हाला क्लायंट लोकेशन (डेन्व्हर हामेरीका ) ला पाठवण्याचा असा कंपनीच्या द्रुष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ;-) , तर आमची विजा मुलाखत(L1-B) ह्या महीन्याच्या २७ ला (चेन्नई) ठरली आहे. पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ,कंपनीने आमच्याच अकाउंट च्या ५ आणखी लोकांचा विजा ईनिशीयेट केला होता (L1-B - 4 , L1-A -1) आणी पाचही लोकांचा विजा रिजेक्ट झाला. आता आम्ही आमचा विजा मिळण्याबद्द्ल थोडे निराशावादी झालो आहोत.. एक प्रयत्न म्हणुन मिपाकरांची मते ( विजा मुलाखतीची तयारी ,विचारल्या जाणार्या प्रश्नाचे स्वरुप आणि आणखी काही विशेष तयारी) जाणुन घ्यायला आवडेल. तुमचे स्वताच