Skip to main content

हसत खेळत चीनी भाषा शिका, व त्यांच्या स्वागतास तयार राहा.

लेखक गांधीवादी यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मी 'आपण गेली काही दिवस काही दिवस रोज एकेक इंच मागे सरकतो आहे', अश्या बातम्या ऐकत आहे. आणि त्यातच आता मला 'नुकत्याच मिपावर झालेल्या चर्चेनुसार' सैनिकांवर जो काही उरला सुरला विश्वास होता तो देखील संपला. मग आता काय ? आपल्याला दारात आरती घेऊन चीन पाकड्याचे स्वागतास कधी सज्ज व्हावे लागेल सांगता येत नाही. रात्र रात्र झोप देखील लागत नाही, कि कधी दारावर थाप पडते आणि एखादा चीनी दर ठोठावून म्हणेल कि "नि हाव". पाकाद्यांची उर्दू थोडी फार समजते पण हे चीन्यांचे बोलणे माझ्या सारख्या सामान्यांना कसे समजणार ?

मिश्र डाळींची इडली.

लेखक रेवती यांनी रविवार, 19/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मीठ, मिक्सर, इडलीपात्र. कृती: वरील तीनही डाळी प्रत्येकी अर्धा कप घ्याव्यात. स्वच्छ धुवून एकत्र भिजवाव्यात. चार ते सहा तासांनी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवावे. सहा ते आठ तासांनी इडल्या कराव्या. त्यासाठी इडलीपात्राला तेलाचा हात लावून पीठ घालावे. पंधरा मिनिटे वाफवून चटणीबरोबर इडल्यांचा आस्वाद घ्या! या इडल्या फक्त डाळींपासून केलेल्या असल्याने प्रथिनयुक्त आहेत व पचनास जड आहेत. याबरोबर चटणी जास्त चांगली लागते. सांबार नसलेले बरे. रात्रभर पीठ आंबवण्यास ठेवू नका. हा पदार्थ माझी मैत्रिण डॉ.

ओ कलकत्ता

लेखक पैसा यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं. कॉंफरन्स सुरू झाली. नाश्ता जेवण सगळं वेगळ्याच बंगाली चवीचं पण स्वादिष्ट होतं. दिवसभर भाषणं वगैरे झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही तिथेच, म्हणजे महाजाति सदन मध्ये होती. रसभरे रसगुल्ले खाउन रसना तृप्त झाली. जेवण जरा जास्तच झालं.

होईल कधी गे भेट ?

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
होईल कधी गे भेट ? कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट ओझरते मी तुला पाहिले थार्‍यावरचे चित्त उडाले मनोरथांचे चढले इमले क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत ओठांवरती शब्द न येती मनात पण पाझरते प्रीति परतून जेव्हा पडेल गाठी नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत एकच आशा येशील गे तू जुळतील धागे जुळतील हेतू केव्हा होईल भेट परंतू अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

नासकवणी

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नासकवणी आठवते का? :) खूप मस्त लागते. दूध नासवा ( पाव लिंबू पिळून); फार पिळू नका नाहीतर आंबट होईल. दूध फाटलं की घट्ट भाग खाली बसेल आणि पांचट वर ऊरेल तो घट्ट भाग वेगळा करा त्यात साखर घाला गॅसवर ऊलूसं हलवा कारण साखरेचा पाक होतो तो जावा म्हणून थंड किंवा गरम वाढा. नासकवणी हाझीर है|

कोनि आहे का ?

लेखक रवि यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो , आपल्यपैकी कोनी सध्या Lausanne , switzerland येथे राहत असेल ़तर जरुर कळवा. मी नुकताच येथे आलोय. कोनी मिपाकर येथे असतिल तर व्यनी करा किंवा येथे लिहा. धन्यवाद.

सामना व राहुल गांधी

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 18/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्याविरुद्ध सामना या वर्तमानपत्रात असे लिहिले आहे * कश्मीर प्रश्‍नासंदर्भात ओमर यांना अधिक वेळ व मदत देण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. * पावट्याला पावटा मिळाला! अरे राहुल पावट्या, तुझ्या पणजोबांंनी म्हणजे पं. नेहरूंनी कश्मीरची वाट लावली.