Skip to main content

माझी ओरिगामी

लेखक पिंगू यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे..

लाभले आम्हास भाग्य..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
'लाभले आम्हास भाग्य.. ' भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या.

हैदराबाद मध्ये राहण्या करिता मदत

लेखक अभिशेक गानु यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझा एक मित्र हैदराबाद ला शिफ्ट होतो आहे कामा निमित्त, जर कोणाच्या ओळखीत खालील परिसराच्या आसपास काही राहण्याची सोय असल्यास जरूर कळवावे अमीर्पेत येल्लारेद्दीगुडा धन्यवाद अभिषेक

भारतीय इंग्रजी माध्यमांचे अनाकलनीय वर्तन

लेखक महानगरी यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला आणि माझ्यासारख्या अनेक भारतीय नागरिकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. बहुचर्चित रामजन्मभूमी - बाबरी मशिद वादात हिंदू गटांचा दावा मान्य करण्यात आला व वादस्त जागेची मालकीही सोपवण्यात आली. सुन्नी वक्फ़ बोर्डास १/३ जागेची मालकी देण्यात आलेली असली तरी हा निकाल सर्वसाधारणत: हिंदूंच्या बाजूने लागल्याचे दिसते. लोकशाही ही बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर करण्यासाठी राबवली जाते. न्यायालयाचा निर्णय हा इतर पुराव्यांच्या उपलब्धी/अनुपलब्धी बरोबरच बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करणारा आहे.

रुपये१००१

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 01/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार. इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो. माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही.