अवचित गवसावे काही जे...
प्रश्न पडावा असा की
ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला चिडवीत नव्या
उत्तरास
शोधत यावा
वाट दिसावी अशी की
अद्भुत प्रदेशी जाताना
विरून जाव्या पुसून जाव्या
सार्या
हळव्या खुणा
सूत्र सुचावे असे की
ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे
अधिक
गुंफण्यास
अवचित गवसावे काही जे
ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या
स्थलकाला
वाकुल्या
काव्यरस
बस करा वृद्धांचे फालतू लाड
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय .
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.
वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे.
आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये.
द विच ऑफ पोर्टोबेलो(ऐसी अक्षरे ....मेळवीन -४ )
पुस्तक –द विच ऑफ पोर्टोबेलो
लेखक-पाउलो कोएलो
इकडे पलिकडेच खफवर धारपांच्या पुस्तकांची चर्चा चालू होती.वाचनालयात धारपांची दोन तीन पुस्तक चाळली.झोपेत भूतखेत येण्याचे पर्याय दिसू लागले,पुस्तक तिथेच ठेवली.तेवढ्यात हि बया दिसली !भुतासारखी खाली वाकलेली..पांढरी फटक उघडी पाठ असलेली...मुखपृष्ठावर !लेखकही माझा आवडताच होता.काय हरकत आहे थोड धाडस केलं पाहिजेच म्हणत पुस्तक घेऊन आले.
नेहमी प्रमाणे माझ्या हातात नवीन पुस्तक दिसल्याबरोबर मुलीले प्रश्न
कोकणी आणि मराठी कवितांचा आस्वाद
कवी बा भा बोरकर यांचं कविता म्हणजे नैसर्गिक सौदर्य आणि स्त्री सौदर्य यांचे एक शालीन मिश्रण ...
काव्यरस
शिवशाहीर.....
.
काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा.
वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं.
अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी.
छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा.
आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे.
परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी.
.
झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील.
उतरत्या संध्याकाळी....
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये.
हरवल्या नजरेला काही काही दिसू नये.
चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची,
धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये.
उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू,
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी.
हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी.
उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती.
जपताना धागा धागा धर थोडी राख हाती.
मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात,
इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..
पारगाव भातोडी- १
पारगाव भातोडी
गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.
रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कम
रिअॅलिटी’ शो
‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows
"Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people."
-----Alfred Bester in The Demolished Man
तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे.
बायकोन खूपच आग्रह केला.पण तात्या बधला नाही. ‘अवास्तव धमाल’ हा नवीन चॅनेल धामधुमीत सुरु झाला होता, उद्घाटनाला बड्या बड्या धेंडांनी आवर्जून हजेरी लावली होती. कोण नव्हते आले? सी.एम तर होतेच होते.
मिसळपाव