Skip to main content

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

लेखक बज्जु
मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.

पाकिस्तानी शस्त्रागारांतून नाहींशी झालेली तीस लाख शस्त्रें आपल्यावर रोखली जाणार?!

मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वरील फोटो 'डॉन' वृत्तपत्रातील असून तो 'AFP'ने 'डॉन'ला पुरवला आहे. पाकिस्तानी तालीबान आणि इतर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असणारे व त्यांच्या कुकर्मात सक्रीय असलेले लोक पोलीस व सैन्यासारख्या सुरक्षादलात आहेत हाच या जवळिकीचा अर्थ आहे. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'डॉन' हे क

माहिती हवी आहे ..

लेखक स्पा
मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील महिन्यात " अजिंठा - वेरूळ " जाण्याचा बेत आहे .... त्यासोबत " अंबेजोगाई - माहूरगड - पैठण - लोणार " असे करता येईल काय? वरीलपैकी कोणती ठिकाणे जवळ आहेत? औरंगाबाद वरून "लोणार" किती लांब आहे? (इंटरनेट वर माहिती शोधण्याच्या प्रयत्न केला.... पण हे सगळे ३ ४ दिवसात करता येईल अशी माहिती मिळाली नाही... कोणी यापूर्वी या ठिकाणांवर जाऊन आले आहे का? )

दिवाळी अंक

लेखक अवलिया
मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे नाना चौपाटीवरची गंमत पाहुन निघाला. रस्त्यातुन परा धावत आला आणि "नाना ! नाना ! " हाका मारुन थांबायला सांगु लागला. "काय रे ? काय झाले ?" "काही नाही रे ! हे बघ आज क्याफेत पाचशेचा धंदा झाला. चल दिवाळी अंक आणु विकत ... चार पाच तर सहज मिळतील" "फक्त चार पाच... साला तु मराठी माणुस कधी सुधरणार नाहीस... अरे जुगाड करायला कधी शिकणार?" "जुगाड? आणि तो कसा? च्यायला शंभर शंभर रुपये तर आहेच किंमत... डिस्काउंट देवुन देवुन किती देणार?" "तुला नाही कळणार.. मी सांगतो तसे कर... चल जरा तिथे बसु निवांत आणि सांगतो..

दुचाकीवर चारपायी

मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दसर्‍याला दुचाकीवरुन जरा बाहेर पडलो आणि एक अविस्मरणिय द्रुष्य पहिल. 2V4

प्रतीक्षा

मंगळवार, 19/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात सुगंधास्तव तुझ्या झुरते मुग्ध रातराणी एकांतात दूर लवलवते तेल घालूनी ज्योत नयनी गवाक्षात थरथरे पालवी अस्वस्थपणे तरंग उठवुनी डोहात ताटकळते उभी तशीच ओल्या दवात भिजुनी चिंब रात जागली तरी तशीच बसली ती पाखरे अजुनी कोटरात तुझ्या आगमनाची अशी प्रतीक्षा राहिली भरुनी चराचरात जरी होईल निस्तेज तो दिशा उजळता होऊनी प्रभात तरी थांबला बघ तुला पाहण्या चंद्रमा अजुनी अंबरात...
काव्यरस

कॉर्पोरेट तमाशा १३- नशा आणि हँगओव्हर

लेखक रन्गराव
सोमवार, 18/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ऑफिसमध्ये पोहचलो तर काय आश्चर्य - पूर्ण टीम आज गायब होती. मनात विचार आला " लढाई सुरु होनेस अजून काही क्षण आहेत तेंव्हा थोडा कॉफी घ्यायला काही हरकत नाही!" कॅफेमध्ये गेलो तर तिथ पूर्ण संसद भरली होती. मला तिथं पहताक्षणीच बळीचा बकरा दिसावा तसा हूरूप सगळ्यांच्या चेहर्यावर होता! गीता- " कॉफी राहू द्या. या इथं आधी. आज चांगली हजेरी घ्यायची आहे!" मी मला काहीच कल्पना नाही अशा अविर्भावात "वा, आज चांगल्याच खूष दिसताय! आदीनं काही गिफ्ट दिलं की पगार अजून वाढ्वून मिळाला?" खरं तर तिचे डोळे चांगलेच सुजले होते, काल चांगलीच रड्ली असणार आहे! तिला पाहिजे तर शिव्यांची लोखोली वाहू दे पण आज परत रडारड नको!