Skip to main content

आंधळी कोशिंबीर

Published on गुरुवार, 28/10/2010
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

टिळक कि दाते

Published on गुरुवार, 28/10/2010
टिळक कि दाते फार पुर्वि महाराष्ट्रात दिवाळी दोन वेळा साजरी व्हायची..एक टिळक पंचांगा प्रमाणे..व एक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे. अर्थात बहुसंख्य लोक दाते सोलापुरकर पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करतात.. आपल्या समुहात टिळक पंचांगा प्रमाणे दिवाळी साजरी करणारे सभासद वा आपल्या माहितीचे कुणी आहेत का?

आत्महत्या २० -२२व्या वर्षी.

लेखक ५० फक्त
Published on गुरुवार, 28/10/2010
आत्महत्या ---- का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ?

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

Published on बुधवार, 27/10/2010
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्‍या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्री. पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो.. [मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse-montreal या दुव्यावर वाचता येईल.

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

लेखक मितान
Published on बुधवार, 27/10/2010
आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ? पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात. " मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार " " मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? " " वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते.

करंजीचे पुरण

लेखक जागु
Published on बुधवार, 27/10/2010
लागणारे साहित्य: गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्‍याच्या वाट्या मुगाचे पिठ १ वाटी रवा अर्धी वाटी कणीक अर्धी वाटी २ चमचे खसखस चारोळी बेदाणे आवडते ड्रायफ्रुट्स वेलची पावडर तुप पिठी साखर क्रमवार पाककृती: तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्‍याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा. आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्‍यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो.