Skip to main content

राज ठाकरे हे नाही करू शकले !

लेखक यकु
Published on सोमवार, 08/11/2010
राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते.

उजव्या सोंडेचा गणपती

लेखक शुचि
Published on सोमवार, 08/11/2010
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते.

एक सुरेल आठवण

लेखक मूकवाचक
Published on रवीवार, 07/11/2010
माझ्या नॉस्टॅल्जिक आठवणी बहुतांशी शास्त्रीय वाद्य संगीताच्या आहेत. कधी काळच्या कित्येक मैफली ध्वनीचित्राफितीसारख्या मनात कोरलेल्या आहेत. २९ डिसेंबर २००२ ची उ. विलायत खान साहेबांची सवाई मधली (शेवटची) मैफल त्या पैकी एक. उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत. सतार या तंतू वाद्याच्या रचने मध्ये आणि ती वाजवण्याच्या तंत्रामध्ये महत्वाचे बदल करून तिला 'गायकी अंग' देण्याचं आणि 'विलायातखानी बाज' प्रस्थापित करण्याचं 'अवतार कार्य' च त्यांनी केलं. निव्वळ सतारच नव्हे, तर एकूणच शास्त्रीय वाद्य संगीताच्या प्रचलित मर्यादा ओलांडणारी ती क्रांतीच होती.

नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास.

Published on रवीवार, 07/11/2010
नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास. वाचकमित्रहो, विशेषतः मिसळपावप्रेमींनो, नमस्कार! ह्यापूर्वी मिसळपावावर नाडिग्रंथांविषयी बरेच लेखन होऊन गेलेले आहे, बर्‍याच चर्चा झडून गेल्या आहेत. त्यामध्ये एक तमिळभाषक आणि पुरातन तमिळभाषेचा अभ्यासक ह्या नात्याने आत्तापर्यंत कोणीही न चर्चिलेले विषयांस मी हाती घेतले हे आपणांस ठावूक आहेच.

नववर्षदिन ?

लेखक पारा
Published on रवीवार, 07/11/2010
हिंदू समाज, नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरं करतो, तर मग हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षाभिनंदन कसले ? तर हे व्यावसायिक नववर्ष, जसा इंग्रजी तालिकेनुसार १ एप्रिल असतं तसंच हे आपल्यासाठी. आता आपण १ एप्रिल ला नववर्षदिन मानतो का ? नाही तर मग पाडवा का ? ह्याचा मूळ संदर्भ सौर आणि चांद्र कालगणनेत सापडतो असे ऐकले आहे. पण ह्याहून जास्त मला माहिती नाही. कोणी जाणकार ह्याहून जास्त सखोल माहिती देऊ शकेल का ?