Skip to main content

मदत हवी आहे

लेखक महेश-मया यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिसळ पाव सदस्य, कोणी सांगु शकतो का, कोणती अशी मराठी साईट आहे जीथे मराठी पुस्तके वाचण्यास मिळतील,

नेमक काय करायच असते?

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एकच चुक परत परत कशी काय होते बॉ? असु दे असु दे. शुन्य काल आहे. आधी ४ दिवस ऑनसेट. नंतर २ दिवस ऑफसेट. शांत रहा. नंतर नेहमीचे आहेच की. 'अमका' चा लेख वाचला आहेस ना. एका आठवड्याकरता गुड बॉय राहायचे ठरले ना? ___________________________________________________ "किती रुपये लागले"? थांब हां. बघतो. "म्हणजे भाव न करताच कांदे आणलेत"? असु दे हां. बघतो खिसा तपासुन.पन्नास ची नोट दिली होती. तीस रुपये दिलेत. "क्काय? म्हणजे सडका माल दिला असणार. काल केळी स्वस्त आणलीस. पण दोन पण हाताला लागली नाहीत.

बारीचं पुण्य

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका जुन्या मित्राचा फोन आला. "काय अ‍ॅड्या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या बैठकीतलाच होतो. पण फक्त चखणा खायचो. बर्‍यापैकी ओळखीचा आवाज वाटत होता. "बरं. बोला साहेब..." "अ‍ॅड्या तुझ्या घराची खरी शोभा काय सांग पाहू?" "वेळी अवेळी पडिक असणारे माझे मित्र" मी. "छ्छे.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!" अचानक हा शिव्यांवर आलेला पासून माझं टाळकंच सटकलं. "अरे म्हणजे तुझ्या घरी लोकं का येतात? असं विचारतोय मी. छ्छे! साल्या तुझंच घर आणि तुलाच घराची खरी शोभा काय हे माहीत नाही?" छ्छे छ्छे छ्छे! "हम्म...

(बारीचं पुण्य)

कोडे "मी"

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी जर "मी " असेन अर तुम्ही कोण आहात?

फेत्तुचीन मारीनारा (पास्ता)

लेखक खादाड अमिता यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पास्ता म्हंटल कि कायम 'यमी' असे उदगार कानावर पडतात. पण आमची आई, पास्ता करू न आई, असं आम्ही कितीही केविलवाणे चेहरे करून सांगितलं तरी म्हणायची 'काय ते मेले मैदे, पोटात चिकटून बसतात आणि जाडी वाढवतात'. तेव्हा वाटायचं, आमचीच आई आम्हाला कधी ही पास्ता खाऊ देत नाही! पण आता आई नाही असं म्हणत. कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते. हल्ली पुण्या मुंबई कडे तर होल व्हीट पास्ता विकत पण मिळतो.

पुण्यातील जल्लोष

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज अ‍ॅश मजेत होती. आपल्या आई-बाबांनी आपलं नाव ऐश्वर्या ठेवल्याच्या आनंदात आज ती होती कारण त्यांच्या गॅदरींगमधे ऐश्वर्या-अभिषेक-करिष्मा अश्या पात्रांभोवती फिरणार्‍या नाटकात तिला स्वतःच्या नावाचा रोल करायला मिळणार होता. शाळा सुटल्यावर अ‍ॅश पळतच घराकडे निघाली. नीट बांधलेल्या फुटपाथपरून ती थेट घरी येऊ शकते त्यामुळे आईला तीला शाळेत घ्यायला जावं लागतंच नाही. तसं पुण्यात रहायला आल्यापासून अ‍ॅशची आई बरीच सुखावली होती.

कोडे

लेखक शुचि यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे. (१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर.