Skip to main content

साँदेश

लेखक गणपा यांनी गुरुवार, 06/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!! म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी. साहित्यः प्रमाण साधारण १० साँदेशसाठी.

गोळ्याची आमटी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 06/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)एक वाटी बेसन. २)दीड कान्दा. ३)दोन हिरव्या मिरच्या. ४)कोथिम्बिर ५)चिन्चेचा कोळ. ६)दोन वाट्या किसलेले ओले खोबरे. ७)१/२ चमचा मिरची पूड.

पातोळ्या.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
गगनविहारी यान्च्यासाठी पातोळ्याची पाककृती. साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८. २)२ वाट्या तान्दुळाची पिठी . ३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे. ४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ. ५)चिमुटभर वेलचीपुड. ६)मिठ चविनुसार. ७)थोडे तेल. कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे. गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे. २)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे. पाणी उकळले की त्यात तान

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

भारतरत्न लतादीदी व आशा ताई

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
asha& lata आपल्या भारतरत्न लतादीदी यांनी twitter वर प्रकाशित केलेला फोटो ! (मी संग्रही केला) लतादीदी व आशा ताई एका मंगलक्षणी फुगडी खेळत असता !! मिपाकरांकरिता खास!!!@!!!!

दहशतवाद

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान भारताला एखाद्या कुत्र्यासारखा चावतोय. लचका तोडतो आणि मग भ्याडासारखा शेपूट घालून पळून जातो. १९९२ चे जबरी बॉम्बस्फोट, २६/११ चा रक्तपात, लोकल ट्रेनमधले आणि बेस्ट बसमधले बॉम्बस्फोट, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, संसदेवरचा हल्ला, जर्मन बेकरीतला स्फोट, हैदराबादचा स्फोट...काही विचारू नका. शिवाय जगभर धर्मांध अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तर संतापजनक आहे. ९/११ चा विमाने घुसवून इमारती पाडण्याचा अघोरी प्रकार असो की अजून कुठल्याही देशात होणारा रक्तपात असो, धर्मांध अतिरेकी जगाला बुडवायला निघालेले आहेत. सगळ्या देशांनी या 'जिहादीं'ची धास्ती घेतलेली आहे.

ओळख

लेखक चिप्लुन्कर यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो , शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे . नव्या वर्षाची हि एक मला चागली भेट मिळाली आहे असे मला वाटते . सर्वाना आपली ओळख कशी करून द्यावी हे न कळल्या मुळे ओळखीसाठीच हा काथ्याकुट. तूर्तास इतकेच. महा - ०८ चिपळूणकर

किती वर्षाने असे निवांतपण ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षाने असे निवांतपण स्वच्छ आभाळ नि असे मोकळेपण खिडकीवर बसलेली चिमणी नि तिचे एकटेपण खिडकीतून दिसणारे चिमणीच्या मागचे गुलमोहराचे झाड ते आभाळ तो ढगांचा शुभ्र कल्लोळ आभाळात शांत विहरणारी घार कसे शांत ,स्वच्छ निवांत ध्यान लावून बसलेय हे वातावरण बायको बसलीय देवघरात देवाजवळ काय मागतेय देवाजवळ कुणास ठाऊक ? चेहऱ्यावरचा शांत भाव प्रसन्नपणा सगळे मिळाल्याची तृप्तता तृप्तीचा हा अनोखा क्षण तो सेव्ह करून ठेवतोय कितीतरी वेळा सेव्ह न केल्यामुळे डिलीट होऊन गेल्यात कितीतरी घटना ,प्रसंग आयुष्याच्या ऊतरवंडीवरचे हे क्षण हे निवांतपण कोठे हरवून गेले ते क्षण ते सुख नि ते तारुण्य .
काव्यरस

तंदुर चिकन

लेखक जागु यांनी बुधवार, 05/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच जणांचा मार्गशिर्ष महिना सुटला असणार म्हणून दाबुन ठेवलेली रेसिपी आज वर आणत आहे. लागणारे जिन्नस: चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे. मॅरीनेड करण्या साठी : घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा) लिंबु रस आल, लसुण, पुदीना पेस्ट मिठ लाल तिखट गरम मसाला रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर. तळण्यासाठी बटर किंवा तेल सजावटीसाठी कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी. क्रमवार पाककृती: चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा.