Skip to main content

समांतर विश्वात पक्की

लेखक भागो यांनी गुरुवार, 20/01/2022 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
Wizard -- A person, who is permitted to do things forbidden to ordinary people; one who has wheel privileges on a system. “ She doesn’t believe in anything magic,” explained Jo, seeing that Silky looked rather surprised. “Don’t take any notice of her, Silky. She’ll believe all right soon. ” Enid Blyton The Folks Of The Faraway Tree Alice laughed. 'There's no use trying,' she said: 'one CAN'T believe impossible things.' 'I daresay you haven't had much practice,' said the Queen. 'When I was your age, I always did it for half-an-hour a day.

भिकारी (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 20/01/2022 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
"गरिबावर दया करा साहेब. तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब. रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कोपेक्सदेखील नाहीत हो. देवाशपथ सांगतो. पाच वर्षं गावाकडे मास्तर होतो. झारच्या या नव्या झेम्स्तवो सरकारच्या कारस्थानामुळे नोकरी गेली माझी. खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा. वर्ष झालं, मला राहायला घर नाही, साहेब." सेंट पीटर्सबर्गमधले वकील स्क्वॉर्तसोव्ह त्याच्याकडे बघत उभे होते. त्याचा तो गडद निळा फाटका कोट, नशा केल्यासारखे धुंद डोळे, गालावरचे तांबडे डाग पाहून त्यांना वाटलं, आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे. तो पुढे बोलत राहिला, "आणि आता मला त्यांनी कालुगा प्रांतात नोकरी दिली आहे.

विनिपेग डायरीज

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 20/01/2022 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो.

वेळणेश्वर राईड

लेखक मालविका यांनी गुरुवार, 20/01/2022 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लेक (वय वर्षे 10) याने त्याच्या बाबांसह आमच्या घरापासून वेळणेश्वर पर्यंत सायकल राईड केली. दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने परत घरी आले. त्याने केलेले हे प्रवासाचे वर्णन. वेळणेश्वर राईड दिनांक १० जानेवारी २०२२ आम्ही वेळणेश्वरला सायकलने जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करायला सुरवात केली. आम्ही १५ तारखेला ठरवलं कि उद्या वेळणेश्वरला जाऊया. मग आम्ही अगोदर सायकल रिपेअर करून घेतल्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. सकाळी ५:१५ ला उठलो व तयारी केली. आई आणि आजोबा गाडीने येणार होते व मी आणि बाबा सायकलने. आम्ही सकाळी ६:१५ ला निघालो.

वजनकाटावाला

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 20/01/2022 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
वजनकाटावाला --------------------- तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन. पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती. त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता . त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे . चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या . तो तसाच राहिला .

ध्रांगध्रा - १५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 20/01/2022 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यात जाळ पेटावा तशी आग आग होतेय. मी डोके उशीवर स्थिर टेकवायचा प्रयत्न करतो. ..... मेरी गो राउंडच्या पळण्यात खाली खाली जाताना जसं वाटते तसं काहीसं खाली खाली जातोय. खाली ..... आणखी खाली...... आणखी खाली. पृथ्वीला तळ नसल्यासारखे वाटतय. खाली...... खाली.... डोळ्यापुढची उजेडाची जाणीव नाहिशी होतेय. डोळ्या समोर अंधार पसरतोय. सुखद गारवा देणारा अंधार.... मागील दुवा ध्रांगध्रा - १४ http://misalpav.com/node/49793 कसलेसे आवाज येतात. कोणीतरी बोलतय. मी हळू हळू डोळे उघडतो. पांढरं स्वच्छ छत.

ध्रांगध्रा- १४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 18/01/2022 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
गावातली घरं आता मागे पडलीत. अंधार त्यामुळे अधीकच गडद वाटतोय. आकाशात चंद्र... त्याचाच काय तो उजेड. आता आम्ही गावाबाहेरच्या खंदका जवळ आलोय. वाट खंदकाच्या पायर्‍यांपर्यंत पोहोचते.महेशने पायर्‍या उतरायला सुरवातपण केलीये. मी कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे कोंबतो.झीप लावतो. आणि महेशच्या पाठोपाठ खंदकाच्या पाण्यात पाऊल टाकतो मागील दुवा ध्रांगध्रा - १३ http://misalpav.com/node/49786 खंदक पार केला की पलीकडे पोहोचू.पाण्यातून आम्ही धावतोय. पाणी जवळजवळ कमरे इतके आहे. कमरेइत्तक्या पाण्यातून धावणं अशक्य असतं .

गुजरात सहल २०२१_भाग ४- पोरबंदर, माधवपूर,सोमनाथ (प्रभास पाटण)

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 18/01/2022 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका येथे वाचा सहलीचा पाचवा दिवस. आज सोमनाथसाठी प्रवास सुरु करायचा होता. द्वारका ते सोमनाथ प्रवास चार तासांचा (२३०किमी) असला तरी वाटेत काही ठिकाणे बघायची असल्याने हा प्रवास सात-आठ तासांचा होणार होता. सकाळी सात वाजताच चहा पाहिजे म्हणून कॅन्टीनवाल्याला रात्रीच सांगून ठेवले होते. साडेसहालाच सर्व जण तयार होऊन सामानही गाडीत रवाना झाले होते. चहा झाला. हॉटेलचे बिल चुकते करून साडेसातला प्रवास सुरु झाला. आज पहिला थांबा होता 'पोरबंदर'. रस्ता अतिशय चांगला असून सकाळच्या वेळी रहदारीही जास्त नव्हती.