Skip to main content

कश्मिरि चिकन करी......

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कश्मीरी चिकन करी.... साहित्य ;- चिकन १ कि., २ टी स्पून बदाम काप,१/२ कप दही , कांद्याची पेस्ट दिड वाटी, ४-५ लवंगाची भुकटी ,४-५ हिरवी इलायची ,आल लसून पेस्ट २ चमचे, २ टमाटर बारीक कापलेले, गरम मसाला १/२ चमचा, ६-७ काश्मिरी लाल मिरच्यांची पेस्ट (नसेल तर आपली नेहमीची चालेल ),मीठ बस ........ गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि तळलेले काजू कृती :- चिकन स्वछ धुवून घ्या , (एरवी आपण चिकन करताना आधी ते शिजवून नंतर फोडणी करतो पण काश्मिरी चिकन मसाल्या मध्येच पूर्ण शिजवून

सर...

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तु पावसाच्या सरिसारखी अचानक येतेस...अंगावर कोसळतेस... कळत नाही काय होतंय ते... मी सुद्धा डोळे बंद करुन अथांग भिजण्याच स्वप्न पाहतो... भिजतोहि थोडा... पण अचानक हि सर निघून जाते... डोळे उघडतो... मी अर्धवट कोरडा... वाट पाहतो, पुन्हा ती सर येन्याचि... पण महित असत... ती सर आपल्यासाठी नाही...आणि येणारही नाही पण कोणास ठाऊक मी असा का वागतो... वाचता आल असत मला अर्धवट भिजन्यापसुन... टाळता आल असत हे पण माहित असून सुद्धा मी पुन्हा डोळे झाकतो... सर येण्याची वाट पाहतो, पुन्हा भिजण्यासाठी, अर्धवट का होईना... स्वप्न पाहतो, माहित असत कि फसवतोय स्वतःला, पण दुर्लक्ष्य करतो ह्या गोष्टीकडे.
काव्यरस

वेळ झाली!

लेखक गुंडोपंत यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच तेथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो उपक्रमावर दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते.

दम आलू

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ८-१० बेताचे उकडलेले छोटे बटाटे (सालं काढून घेणे) २-३ मध्यम कांदे बारीक चिरून किंवा किसून २ मोठे टोमॅटो बारीक चिरून पाऊण वाटी दही ३ टीस्पून आले-लसूण वाटून २ तमालपत्र १-२ दालचिनीच्या काड्या पाव चमचा जिरे १ चमचा लाल तिखट ( आवडीनूसार कमी-जास्त करणे) १ चमचा कश्मिरी मिरची पावडर १ चमचा गरम मसाला १ टेस्पून खसखस भिजवून वाटलेली १ टीस्पून कसूरीमेथी मीठ चवीनूसार तेल चिरलेली कोथिंबीर पाकृ: उकडलेल्या बटाट्यांना काट्याने टोचे मारुन घेणे. सर्व बटाटे तेलात खमंग तळावेत व बाजूला टीश्यूवर ठेवावेत. दुसर्या भांड्यात तेल तापवून तमालपत्र, दालचिनीच्या काड्या आ

उन्नत क्षण

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो.

पालक खिचडी

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तांदुळ - २ वाट्या तुरीची डाळ - १ वाटी पालक - ४ वाट्या बारीक चिरुन कांदा - १ कप बारीक चिरुन टोमॅटो - १/२ कप बारीक चिरुन आले-लसुण-मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा काळी मिरी - २-३ लवंग - २-३ जिरे - १ चमचा गरम मसाला पावडर - १ चमचा लसुण - ४-५ पाकळ्या बारीक चिरुन सुक्या लाल मिरच्या - ४-५ तुप - २-३ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. तांदुळ व तुरीची डाळ निट धुवुन पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी. २. कढई मधे १ चमचा तुप गरम करावे. तुप गरम झाल्यावर त्यात काळी मिरी, लवंग व जिरे टाकुन परतावे. ३. जिरे परतल्यावर त्यात हळद व बारीक चिरलेला कांदा टाकुन परतावे. ४.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- ५)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) ह्या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ. संगीत दिग्दर्शक- सी. अर्जून १९७५ सालच्या "जय संतोषी मां" मुळे प्रसीध्दी मिळालेले सी.

नवीन मराठी संगीताची विक्री आता तुमच्याही ब्लॉग/वेबसाईटवरून आणि तुम्हाला उत्पन्नही!

लेखक योगेश पितळे यांनी बुधवार, 09/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार, मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल गेली काही वर्षे चालवत आहे.