Skip to main content

शिव शिव शिव!! सेना

लेखक चिरोटा यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
निहार ठाकरे ,आदरणिय हिंदुह्रुदयसम्राटांचे नातु ह्यांच्यावर Prevention of Immoral Trafficking Act खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदरणिय निहार ठाकरे ह्यांच्या मालकीचा सांताक्रुझ येथे लेडिज बार आहे.लेडीज बार मधील अनेक मुलीं वेश्याव्यवसायात असतात असे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

ग्रुहकर्ज ..एक अनुभव

लेखक नि३ यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या घर घर चालु आहे...प्रत्येक विकांत असाच पायपिट करण्यात व्यर्थ ...१ BHK घ्याव कि २ BHK.ह्या एरीयात घ्याव की त्या तिथे पलीकडे...दिनोदीन जमिनीचे रेट वाढतच आहे..ग्रुहकर्जाचे व्याजदर पण..काही दिवस आणखी थांबलो तर घर घ्यायची लायकी राहणार नाही आपली पुण्यात. आणि नाही हो करता करता ..शेवटी एकदाचा बुक केला ...

बेंचमार्क

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी, मिपावर जेव्हा काहीशे सदस्यच होते, तेव्हा आम्हाला कोणालाही हापिसामधे काहीच काम नसायचं. परा (परिकथेतील राजकुमार) हा आधी नव्हताच आणि आला तेव्हा नवा होता, टिंगीचा टिंग्या झाला असला तरी तेव्हा तो "दुशली ब" मधे नव्हता. आनंदयात्री, धमाल मुलगा, छोटा डॉन, मेघना भुस्कुटे, ब्रिटिश टिंग्या, ऋचा (ही पार गायबच झाली आहे), मी असे आम्ही निरुद्योगी लोकं मिपाच्या खरडफळ्यावर पडीक असायचो. अधूनमधून कोणी मैत्री किडे यायचे, स्त्री आयडींना खरडी टाकायचे आणि त्यावर इनोबा म्हणे, टिंग्या, बिपिन वगैरे लोकं "माझ्याशी पण मैत्री करणार का?" असा 'लष्कर-ए-खरडा'चा हल्ला करायचे.

कोसळत्या सरींचा राजमाची

लेखक जातीवंत भटका यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळत्या सरींचा राजमाची शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते.

मराठीतले काही उच्चार.

लेखक स्वतन्त्र यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत काही शब्दांचे वेगवेगळे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात. उदा.:- 'बसणार' चा उच्चार 'बश्णार' असे करतात.तर काही 'बसणार' असेच करतात. तसेच असणार-अश्णार 'च','ज' चा उच्चार देखील वेगवेगळा करतात. तर अशा काही शब्दांचे स्वच्छ मराठीत योग्य उच्चार कोणते आहेत यावर माहितगारांनी प्रकाश टाकावा.

गुरुवारचा शेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शाम है जाम है ; सुबह है जाम है दोपहर मे भी जाम है ; इधर भी जाम है ; उधर भी जाम है नजरीया ये आम है ; जहां देखू जाम है . . . . . . . ट्रॅफीक जो बढ गया है ;अब रस्ता ये आम है

उठवू नका मज आता

लेखक निनाव यांनी गुरुवार, 10/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही