Skip to main content

चित्त रमले हरिपायी ....

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चालीवर लिहिण्याचा पहिला प्रयत्न ... सोडली जुनी वहाणे .... चाललो पंढरीचे ठायी .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... आला न्यानियाचा गाव .... जमले सारे रंक नि राव .... हरिनामाच्या घोषात ... उभा आसमंत न्हाही चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... रूप पाहता लोचनी .... तृप्त जाहलो ध्यानीमनी .... पाहून सावळा मनोहर .... भान हरपून जाई .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... विसरुनी रोजचा रहाट .... झाली नवीन पहाट झालो कधी मोकळा .... माझे मलाच कळले नाही ... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....

बृस्केत्ता टोस्ट (इटालियन अपेटायझर)

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही पाक्रु 'सामना' च्या फुलोरा आवृत्तीत पण छापून आली होती. त्यावर 'उपक्रम' संकेतस्थळावर बरीच चर्चा झाली. चर्चे चा मुद्दा हा होता कि ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये ६५-७५ कॅलोरी असतात तर मग ४ स्लाईस बृस्केत्ता टोस्ट मध्ये २०० कॅलोरीस असे मी कसं लिहू शकते. म्हणून मला इथे हा खुलासा करावासा वाटला. आपण अंतर्जालावर ज्या कॅलोरी काउन्ट वाचतो त्या सगळ्याच बरोबर किंवा आपल्या देशाला, राहणीमानाला अनुरूप अश्या नसतात. उ. दा. क्रीम, पनीर, केक, नान किंवा ब्रेड सारखे पदार्थ. ह्याचे कारण कि इंडिअन आणि पाश्चात्य पोर्शन साईझ मधला असलेला फरक आणि त्या पदार्थाचे ingredients आणि प्रोसेसिंग.

बिचारे खासदार

लेखक शेलार मामा मालुसरे यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
अरेरे गरीब बिचारे खासदार !! फारच वाईट वाटले हो ऐकून !! काय ही दैन्यावस्था ? कसे होणार आता गरीब दिनदुबळया खासदारांचे ? काय दिवस वाईट आले हो , फ़क्त १० कोटी ? अहो आजकाल हजारकोटी आणि लाखकोटी ऐकण्याची इतकी सवय झाली आहे की त्या भुकेल्या खासदाराना फ़क्त १० कोटी प्रत्येकी मिळाले म्हणजे खुपच डिग्रेडेशन झाले की हो, आजकाल आमदारसुदधा एव्हढ्या रकमेस... नाक मुरडतात . नगरसेवकाना सुध्धा या रकमेने हर्षवायु होत नाही . कोणी तरी जाउन आपली कैफियत संसदेत मांडा हो ,त्यासाठी कोण्या खासदारास पैसे हवे असतील तर लोकवर्गणी काढून आपण ते पैसे पोहोच करू ...

होश वालो को खबर क्या !!!!

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
होश वालो को खबर क्या !!!! काल सन्ध्याकाळी महत्वाचा सामणा म्हणुन Indies Vs England पाहत होतो पण दोन्ही टीम फारच टाईम पास करत होत्या ... असेच T.V.Channel change करता करता ....एका Channel वर माझ्या आवडत्या चीत्रपटा पैकी एक चीत्रपट नुकताच सुरु झालेल होता. "सरफरोश" १९९९ साली प्रदर्षित झालेला जोन मथ्यु मथन दिग्दर्शीत, अमिर खान, सोनाली बेन्द्रे आणि नसीरुद्दीन शहा अभिनयीत. मी त्यातील त्या गझल ची वाट पाहत होतो ज्यामुळे तो चीत्रपट जास्त लक्षात आहे..... आणि बरयाच दिवसात न एकलेली "होश वालो को खबर क्या" गझल गुण-गुण ली ...बरयाच दिवसा पासन एकत आलो असलो तरी आजपण एकताना त्यात तेवडाच नविनपणा जाणवत होता..

चतुर सरदार.

लेखक utkarsh shah यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एक सरदार रोज भारत पाक सिमा ओलांडुन स्मगलिंग (तस्करी)करत असल्याची खबर पाकिस्तानी पोलिसाला कळते.सरदार रोज आपल्या मोटारसायकलवरुन १ पोते भरुन माती घेउन जात असतो.पोलिसाला दाट संशय येतो कि त्या पोत्यातच काहीतरी गडबड असणार, तो खुश होतो.मग पोलिस सरदारच्या मागावार राहुन त्याला चेकनाक्यावर अडवतो.

नेहमीचीच संध्याकाळ

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्‍या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर! सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.

Onsite (I.T.) -1

लेखक किरन वनारे यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
Onsite (I.T.) -1 ज्या गोष्टी दुरुन (चान्गल्या) दिसतात त्या मनाला नेहमी भुरळ घालतात आणि आपला मोह वाढत जातो...कारण त्या फक्त पाहिलेअल्या किवा एकलेल्या असतात पण स्वताहा अनुभवलेल्या नसतात ... जो स्वताहा अनुभवते त्यालाच त्यातले तथ्य माहित असते ..... जोपर्यत आपण स्वता त्या अनुभवत नाहि तोपर्यन्त त्या एका स्वप्ना सारख्या वाटतात.... मग समोरिल अनुभवलेल्या वक्तिने कितिहि समजावले तरीहि आपण त्याला मुर्खातच काढतो... प्रत्येक I.T. Company त काम करणारया "कामगाराचे" एकच स्वप्न असते कि एक वेळा onsilte opportunity मिळायला हवी यार .... मग लाइफ सेटल... त्याला कारण पण तशीच असतात...

भस्म्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रधानमंत्री, कृषिमंत्री व योजना आयो्गाचे मोंटेक सिंह यांनी "भारतीय लोग ज्यादा खाने लगे हैं…इसलिये महंगाई बढ़ी है…" असे एक विधान केले आहे.... निरनिराळ्या वाहिनिवर दाखवले जाणारे..खाना खजाना,,खाद्य भ्रमंत्या..खवय्ये गीरी..तसे जागोजागी दिसणारे फुड ब्लॉग्ज या मुळे क्षूधा वाढण्यास मदत होते का? व खाव खाव सुटते का?.... परीणाम स्वरुप आज सारी हॉटेल्स..पाव भाजी स्टॉल्स.वडा पाव.उपहार गृहे..भेळेच्या गाड्या..पिझ्झा बर्गर्र गृहे तुडुंब भरलेली दिसतात. व चरणे संस्कृति उदयास आली.. अति खा खा च्या भस्म्या मुळे महागाई वाढली असेल का?

चांगले रेसोर्ट किंवा चांगली पिकनिक प्लेस - पुणे १ डे ट्रिप साठी सुचवा.

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याजवळचे १-२ तास अंतरावर असणारे एखादे चांगले रेसोर्ट किंवा एखादी पिकनिक प्लेस सुचवा जिथे येत्या विकांताला वन डे ट्रिप प्लॅन करता येइल. बरोबर सव्वा वर्षाची मुलगी असल्याने तिथे दिवसभर रहाण्याची सोय असेल तर उत्तम. कारण लहान मुलं जनरली रोज दुपारी २/३ तास झोप काढतात. आणि या विषयावर आधी चर्चा झाली असेल तर धाग्याची लिन्क द्यावी.

झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा)

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 18/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा) ब्रेड वडा साहित्य :- ब्रेड, उकडलेले बटाटे ४-५ ,जीर ,मोहरी ,१ वाटी चिरलेला कांदा , १ टी स्पून लाल तिखट ,१ टी स्पून मॅगी मसाला ,मीठ ,ओवा , तिळ १ चमचा ,आणि भरपूर कोथिंबीर ,बेसन २ वाटी बस ........ कृती :- कढइत थोड तेल गरम करून त्यात जीर मोहरी तडतडवा,कांदा परतून घ्या ,लाल तिखट घाला ,चवीनुसार मीठ ,हळद घाला .आता या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक करून घाला,कोथिंबीर घाला छान मिक्स करा ,मिश्रण थोड गार होऊ द्या ,मग हाताने बटाटा थोड