एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस.....
मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो...
नेहमीचीच कामं!
काही सहकार्यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली.....
आता दिवस मोकळा....
पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!!
"ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला....
"हॅलो:....", मी
"हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट....
"हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम!