Skip to main content

मुंबईच्या मनकर्णिके

लेखक शरद यांनी सोमवार, 11/04/2011 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो असकारा पाहुन असा, जीवाचा ससा भेदरुन पळतो तूं तल्लख पुरती खरी !

चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा

लेखक प्रभो यांनी सोमवार, 11/04/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती.. पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर...

प्रेम करायचे राहून गेले...

लेखक बन्या बापु यांनी सोमवार, 11/04/2011 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
काळ काम वेगाचा गणित सोडवताना हिशोब वयाचे राहून गेले, घर बांधता बांधता घरपण मागे राहून गेले. मनात कितीही योजिले होते तुझ्यासाठी, भरभरून ते सगळे तुला द्यायचे राहून गेले. कधीतरी एकांत वेळी आता आठवत काय ते, करूया करूया म्हणत प्रेम तुझ्यावर करायचे राहून गेले. सरणावर आता पसरुनी, मना एकच वाटते, प्याले दोन डोळ्याचे, रिते करायचे राहिले.

का केली मैत्री ही अशी...?

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 10/04/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो । हर्षद अ.प्रभुदेसाई....

कोलंबी /कोळंबी मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 10/04/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ कप स्वछ केलेली कोलंबी /कोळंबी २-३ कांदे बारीक चिरून २-३ लसूण बारीक चिरून २-३ कोकम (आमसूले) दीड टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) १/२ टीस्पून हळद १ १/४ चमचा गरम मसाला मीठ चवीप्रमाणे तेल पाकृ: तेल तापवून त्यात चिरलेले कांदे आणी लसूण घालून परतणे. त्यात कोकम्,सर्व मसाले व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतणे. मग त्यात कोलंबी घालून सगळे एकत्र करणे. झाकण ठेवून ८-१० मिनिटे कोलंबी शिजू द्यावी. शिजलेल्या कोलंबी मसाल्यात आपोआपच कोलंबीचे पाणी सुटेल. वरून बारीक चिरलेले कोथिंबीर घालून चपाती, रोटी सोबत खायला सुरुवात करावी :) आव

टॉप ५ आहारविषयक भ्रमनिरास

लेखक खादाड अमिता यांनी रविवार, 10/04/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षात आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्चात्य पदार्थ पण खातो, करून बघतो. तसेच, आपली आरोग्य आणि आहारा विषयी जागरूकता देखील वाढली आहे. तर जेव्हा आपल्याला एवढ्या माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याच बरोबर बरेच समज गैरसमज पण उदभवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे. जर ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही समज, प्रश्न असतील तर मला जरूर कळवा, मी त्याचे समाधान करण्याचा जरूर प्रयत्न करेन. १.

जगायचं कसं?

लेखक विनीत संखे यांनी रविवार, 10/04/2011 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेंशनर ची डायरी.... आज मी आणि सौ मालाड येथे इनॉर्बिटला मॉलमध्ये गेलेलो. हा मॉल म्हणजे पन्नास वर्षांच्या मुंबईत गुजारलेल्या आपल्या आयुष्यात प्रथमच तिचे सिंगापूर (किंवा शांघाय) होण्याच्या स्वप्नात उचलेले पहिले मोठे पाऊल असल्याचे मनोमन वाटले. (वास्तविक हे एवढे मोठे पहिले पाऊल उचलल्यावर, मुंबईचा पाय मुरगळून ती त्याच पाऊलावर बसकण मारणर होती हे निश्चित होतं... पण पाऊल उचलल्याशी मतलब ... काय? ) मॉल भारी होता. शनिवार संध्याकाळ असल्याने गजबजलेलाही होता.