काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो?
न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
का लढवय्या आता बदनाम होत आहे
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा आता दबला आवाज येथे
खोट्यांचाच येथे चित्कार आहे
------ शब्दमेघ
मिसळपाव