Skip to main content

उद्या कुठे भेटणार?

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 21/05/2011 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मूलतत्ववाद्याच्या म्हणण्यानुसार आज २१ मे रोजी अंतिम निवाड्याचा दिवस (Day of reckoning) आहे. आज जगाचा शेवट होणार असून आपण केलेल्या कृत्यांचा हिशोब आज होणार आहे. तेव्हा उद्या सगळे तिकडेच म्हणजे चित्रगुप्ताच्या/सेंटपीटरच्या कोर्टात भेटू म्हणतो. अनायासे मिपा कट्टा पण होऊन जाईल. :) त्यानंतरही मिपा चालूच राहील अशी आशा आहे. पण मिपाचा सर्वर स्वर्गात असणार की नरकात? सर्व्हर स्वर्गात असेल तर मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येईल का? मी नरकात असणार याची खात्री आहे.

(फळं) खा, पिऊ नका!

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 21/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!' आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.

शाप

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 21/05/2011 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्‍या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ? माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत.

डाल ग कोंबडी डाल

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 20/05/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
डाल ग कोंबडी डाल
डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ|| चोच बारीक लाल लाल पिसं पळतीया कुठं, पकड निट हाती धरून आण तिला इथं नको करू तिच्या जिवाचे हालं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१|| तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत पोरासोरांना खेळू नको देवू तिथं एकांत मिळू दे दोघांना आता कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग डाल ग

एकदा दुपारी!

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 20/05/2011 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
"शू होतीये!" जोरदार रडण्याच्या आवाजात मधेच किंचाळून एक छोटा मुलगा म्हणाला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं. इथल्याच एका गल्लीतली गोष्ट ही. सुट्टीच्या दुपारची शांत वेळ होती. एक कुटुंब रस्त्यावरून चाललं होतं. आई, बाबा, आईचा हात धरून ४-५ वर्षाचा छोटुकला असे पुढे चालले होते आणि चारपाच पावलं मागे छोटुकल्याचा आठनउ वर्षाचा दादा रडत पाय ओढत मधूनच "शू होतीये!" असं ओरडत चालला होता. "अति झालंय हं तुझं आता!" "बोर्डिंगची चौकशी केलीयेत ना हो? तेच बरं. तिथेच जा तू." "शू होतीये तर जा त्यांच्या घरात आणि जाउन कर!" असे आणि या अर्थाचे संवाद अधून मधून आईबाबांच्याकडून येत होते. छोटुकल्याला काय करावं सुचत नव्हतं.

सुक्या कोलंबीची किसमूर.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शुक्रवार, 20/05/2011 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोशिंबिरीला कोकणी भाषेत किसमूर म्हणतात. साहित्यः-१)दोन वाट्या सुकी कोलंबी(दोके मोडून तुकडे केलेली). २)दीड वाटी खवलेले खोबरे. ३)दोन कांदे. ४)दोन चमचे मिरचीपूड ५)एक चमचा मालवणी मसाला. ६)अर्धा चमचा हळदपूड. ७)थोडी चिंच.

नि:संशय

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/05/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
नि:संशय......... खरं तर, ती होती; म्हणून कविता जन्माला आली........... तिच्या अस्तित्वाने ओढ निर्माण झाली आणि अप्राप्यातून ईर्षा....................... सुदैव...........

झटपट ब्रेकफास्ट (चीज ऑम्लेट )

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 20/05/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट ब्रेकफास्ट (चीज ऑम्लेट ) साहित्य : ३-४ अंडी , चीज क्यूब किसून , कांदा बारीक चिरलेला /किसलेला , ३-४ हिरव्या किंवा लाल मिरच्या ,३-४ लसून पाकळ्या बारीक चॉप्स केलेल्या,तेल २ चमचे ,कोथिंबीर , मीठ , काळी मिरे ( पावडर) एक चुटकी ,( तुम्ही आवडत असेल तर टोम्याटो हि घालू शकता ) कृती :-एका बावूल मध्ये अंडे फोडून त्यात वरील सर्व साहित्य घालून छान फेटून घ्या ,पॅनमध्ये तेल घाला ,फेटलेल मिश्रण टाकून स्पून ने पसरवून घ्या .