Skip to main content

च तु र्भु ज

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 17/07/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रवेश १ला स्थळ : महिपतराव पाटलांचा प्रशस्त वाडा आणि त्यासभोवतालचा परिसर) प्रसंग : महिपतरावांची एकुलती एक कन्या हेमांगी चा विवाह संपन्न होत आहे. लग्नसमारंभात काम करणारी नोकरमंडळी आणि त्यांना सूचना देणारे यांची लगबग चालु आहे. मंद आवाजात वाद्ये वाजत आहेत. वातावरणात एक प्रसन्नता भरून राहिली आहे. महिपतराव : (मोठ्याने ओरडून) आरं रामा, शिवा, गोविंदा. कोणी हाय का तिकडं? कुठं मेलेत समदे? हितं अजून किती कामं करायची बाकी आहेत. वावरात खुर्च्या मांडायच्यात. माईक अन् स्पीकर अजून आले नाहीयत. ........ ..... (स्वगत / प्रेक्षकांना) मंडळी आज तुमच्या भाषेत ते नर्वसनेस का काय म्हणत्यात ना..

पिंकी, परी आणि मोर -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/07/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
परीने विचारले, पिंकीच्या कानात - ' यायचं का तुला आंब्याच्या वनात ? मोराचा पिसारा छान पहायला मोरासंगे खूप खूप नाचायला !

मौज वाटली वाचून

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 17/07/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळी एक बातमी वाचली की म्हणे उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपमुख्यमंत्र्य...ांनी म्हटले आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे मला तीव्र दु:ख झाले असून 22 जुलै रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

स्थलांतर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 17/07/2011 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
काळा, शिशु होतो तेव्हा खादाड मी राऊ होतो उनाड मी काऊ होतो बडबडी मी चिऊ होतो स्वच्छंदी मी पक्षी होतो काळा, युवक होतो तेव्हा सशा सारखा मी देखणा होतो हरणासारखा मी चपळ होतो चित्यासारखा मी आक्रमक होतो उमदा मी प्राणी होतो काळा, प्रौढ होतो तेव्हा राबणारी मी मुंगी होतो साठवणारी मधमाशी होतो जाळी विणणारा कोळी होतो कष्टकरी मी कीटक होतो काळा, तुझ्यामुळे मी वृद्ध झालो शिशू-युवक-प्रौढ

चाफा बोलेना, चाफा चालेना

लेखक जागु यांनी शुक्रवार, 15/07/2011 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
चाफा बोलेना, चाफा चालेना खर आहे चाफा कधी बोलला नाही, कधी चालला नाही पण बालपणीच्या मधुर आठवणी मात्र मनात साठवुन आहे अजुन. लहानपणी घराच्या पडविला लागुनच एक चाफ्याचे झाड होते. इतके जुने होते की एखाद्या देवळातल्या पुरातन खांबाइतके जाडे होते. आजीला त्याची फुले देवाला वाहण्यासाठी लागायची.

[ज्योतिष] माझा उत्कर्ष कुठे होईल?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 15/07/2011 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझा उत्कर्ष केव्हा होईल आणि कुठे होईल? हा ज्योतिषांना कायम विचारला जाणारा प्रश्न.यातल्या "केव्हा"चे उत्तर देण्यासाठी दशा, गोचर ग्रह, चलित ग्रह इत्यादींचा उपयोग केला जातो. तर "कुठे" हा प्रश्न पारंपरिक ज्योतिषात अजब तर्‍हानी हाताळला जातो. प्रश्नांची उत्तरे पण संदिग्ध अशीच असतात. पाण्याजवळ उत्कर्ष होईल किंव जुनाट अथवा वडलोपार्जित वास्तूत उत्कर्ष होणार नाही इ. इ.

आभासी जग

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 15/07/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले असतील मैत्रीणीला प्रत्यक्ष भेटून किती महिने गेले असतील अमोरा समोर गप्पा मारुन हल्ली आपण समाधान मानतो त्या 'online chat' वरंच e mail करून मित्राला सांगतो "अरे ping केलं होतं मी तिला कालंच" निवान्त बसून परस्परांची चौकशी करणे कमी झालं आहे Social Networking sites वरच्या status नाच जणू delegate केलं आहे एकत्र येउन पत्ते, carrom खेळ्ण्याचे दिवस देखिल जुने झाले PS3 आणि XBOX वर खेळायलाच वेळ कमी पुरे आमंत्रणं होतात वेग वेगळे Events create करून एकमेकांची खेचत अस्तात publically comments मारून वाढदिवसाच्या शुभेछा offline message टाकून उरकतो Facebook वर snaps upload करण्यासाठीच photo काढू