Skip to main content

जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 22/07/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या काही मित्रांसह जहांगीर आर्ट गॅलरीत (तेथील ऑडिटोरियम हॉल मध्ये) चित्रांचे प्रदर्शन दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०११, करण्याचे योजिले आह, तरी मिपाकर मंडळींनी इष्ट मित्र-मैत्रिणींसह अवश्य भेट द्यावी. आम्ही स्वतः मात्र सध्या पॅरिस मध्ये मुक्काम ठोकुन असल्याने तिथे नसणार.... प्रदर्शन बघितल्यावर प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. चित्रगुप्त http://www.flickr.com/photos/sharad_sovani/

न्यु जर्सी

लेखक गणा मास्तर यांनी शुक्रवार, 22/07/2011 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो. नशिबाने आम्हाला डॅलसला जायच्या ऐवजी न्यु जर्सीमधे येउन पडलो आहोत. इथे बर्गेन कांऊंटीमधल्या सॅडल रिवर नावाच्या जंगलात येउन पडलो आहोत. (खरच हॉटेलच्या आजुबाजुला जंगल आहे, हरणे , ससे दिसतात). आपल्या मिपाकरांपैकी इथे कोणी जवळपास रहाते का? मी सध्या पर्सीपेनी, लेक हाअवाथा इथे घर शोधत आहे. कोणी मदत करु शकेल काय? हाफिसात, हाटेलात आजुबाजुला कोणी मराठी माणुस नसल्याले कंटाळलेला, गणा मास्तर, मुळ गांव भोकरवाडी बुद्रुक, ह.मु. न्यु जर्सी

शिल्लकेला जीव जर का आणखी

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 21/07/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्लकेला जीव जर का आणखी - - - - - शिल्लकेला जीव जर का आणखी ढंग जगण्याचा ठरवला आणखी - उष्णता नरकामध्ये ती काय-शी जाळ दुखर्‍या अंतरीचा आणखी - रागरुसवे खूप त्यांचे पाहिले आज त्यावर कळस झाला आणखी - का निरोप्या पत्र देता निरखतो? तोंडचा संदेश का बा आणखी?

सुख

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 21/07/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
विचारलच कधी कुणाला "कशात वाटतं सुख?" वेग वेगळ्या वयात बदल्ली गेलेली सुखाची व्याख्या अशीच असतील... जेव्हा पाहुणे आल्यामुळे टाळला जातो आईचा मार गणितात पैकीच्या पैकी मिळाल्याबद्दल होतात बाबांकडून लाड जेव्हा तापामुळे मारता येते शाळेला बुट्टी थंड हवेच्या ठिकाणी जातो, लागते उन्हाळ्याची सुट्टी जेव्हा आईला घेतो पहिल्या पगाराची सुंदर साडी आणि बाबांना सांगतो शिकायला चार चाकी गाडी जेव्हा मिळतो onsite chance,होतं कामाचं appreciation होणार्या जोडीदारा बरोबर बघू लागतो भविष्याची स्वप्न आपलं छोटसं नवीन घर सजवण्यात दोन्ही कडील नाती जपण्यात मुलांना चांगलं शिकवून त्यांना वाढवण्यात एक दिवस तरी मैत्रीणींबरोबर भ

ब्राऊ...४

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/07/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
3

प्रिय कॅटरीना,

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 21/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कॅटरिना, सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्‍याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो. परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..!

किती सजवू मी माझं मला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 21/07/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला मन रिंगण घाली तूला ||धृ|| आरसा समोर उभी राहून वेणी घातली गजरा माळून फुले सुगंधी डोई शोभती भुलली मी त्या गंधाला ||१|| नयनांची दोन दले हालती हाती कांकणे किणकिणती कर्णभुषणे शोभती कानी रत्नमाळा हलती गळा ||२|| सुवर्णकांचन सुगंधदर्वळ आनंदाचे फुलले परिमळ उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी पांघरले शुभ्र शरीरा ||३|| शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले मजसमीप हर्षाचे वारे वाहीले लवकरी येवूनी मिठीत घेवून साजरे कर धुंद क्षणांना ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस