आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो,
सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित