Skip to main content

अ आ आई

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 23/10/2011 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई
     

शाब्दिक फराळ

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 23/10/2011 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या दिवाळीत आम्ही अनेक शब्द वेचून फक्कड फराळ पेश करण्याचे ठरवले होते. त्यायोगे प्रयत्न करून विविध विषयांना हाताशी धरले. रुचकर शब्दांची फोडणी देऊन कुरकुरीत चिवडा बनविला. मधाळ शब्दांच्या शर्करेत लाडू वळले. खमंग शब्दांनी युक्त पीठ घेऊन फर्मास अशा चकल्या तळल्या. मउसुत शब्दांच्या पदराखाली चविष्ट शब्दांचे सारण भरून करंज्या केल्या. गोडसर शब्दांचे अनारसे करून त्यावर वेचक शब्दांची खसखस भुरभूरली. एकसूरी शब्दांना घाण्यातून काढून रेखीव शेव तळली. असा हा शाब्दिक फराळ नुकताच आपणापुढे आम्ही ठेवला आहे. आवर्जून या फराळाचे ग्रहण करण्यासाठी हे स्नेहार्द्र निमंत्रण आहे.

आली आली हो दिवाळी-

लेखक विदेश यांनी रविवार, 23/10/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली हो दिवाळी सांगे दारी ही रांगोळी स्वागतास सज्ज राहू प्रकाशात घरोघरी ! सुसंवादी भेटीत त्या काव्य शास्त्र विनोदाच्या - एकमेकांना देऊ या शुभकामना मनीच्या ! करू विना आवाजाने छान दिवाळी साजरी , ठेवू प्रदूषणमुक्त वसुंधरा ही गोजिरी ! गोडधोड चवदार खमंगशा फराळात- भूक गोरगरीबांची नित्य घेऊया ध्यानांत !

बोरे (लोकसत्ता-चतुरंग मध्ये आज प्रकाशीत)

लेखक जागु यांनी शनिवार, 22/10/2011 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार म्हणजे बोरं. बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी दत्तात्रेय म्हात्रे.

पुन्हा एकदा अण्णा.

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 22/10/2011 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार केतकरांनी पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेचे दर्शन केले आहे. त्यांचे वक्तव्य वाचावे. सर्व राजकीय नेते भ्रष्ट आहेत असा दावा करणे हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे लक्षण आहे . शंभर टक्के प्रामाणिक फॅसिस्ट व्यक्तीपेक्षा पन्नास टक्के भ्रष्ट राजकारणी आपल्याला चालेल , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बुधवारी केले . समाजसेवक अण्णा हजारे यांचा थेट उल्लेख न करता केतकर यांनी त्यांच्यावर तोफ डागली . (सवीस्तर बातमी येथे वाचा) कॉग्रेसने टिम अण्णांवर नेम धरलेला आहेच.

एका नवीन देवस्थानाचा जन्म

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 22/10/2011 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची एक जमलेली कथा आहे. माणदेशातील एका लहानशा गावात ही कथा घडते. जून महिन्यातल्या एका सकाळी त्या गवात एक भला मोठा वानर येतो. वैराण, रखरखीत माणदेशात झाडेझुडे कमीच, त्यामुळे असले प्राणी बघायची काही त्या गावकर्‍यांना सवय नसते. त्यातून हा वानर चक्क मारुतीच्या देवळातच घुसतो. आणि मग येऊन एका झाडावर निवांत ऊन खात बसतो. हे बघणार्‍या गावकर्‍यांना मग तर काय साक्षात हनुमान आपल्या गावात आला असे वाटायला लागते. पण शाळेला येणार्‍या मुलांपैकी एक गुलाम मुलगा त्या माकडाला एक भिर्रकन धोंडा फेकून मारतो. मग तो माकड चिडतो आणि उंच पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतो.