मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का??
मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले?
अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला.