Skip to main content

जीवन

लेखक दि ग्रेट मराठा यांनी शुक्रवार, 18/11/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चालणारे दोन पाय किती विसंगत। एक मागे असतो, एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो,मागच्याला अपमान नसतो। कारण त्यांना ठाऊक असत, क्षणात हे बदलणारं असतं। याचंच नाव जीवन असतं..!!

सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 18/11/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय... तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय.. तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..) शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे.

कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 18/11/2011 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती
कौन बनेगा करोडपतीची सांगता झाली आणि भारताच्या तरुणाईचे आशावादी चित्र भावले. उंची वस्त्र प्रावरणे आणि बटबटीत दागदागिन्यात मढवलेल्या व्यक्तिरेखांनी घडवलेल्या नीच, पाताळयंत्री कारवायांमुळे घरोघरी हेवेदावे करत सामान्य समाज जगत असतो असे आभासी चित्र एकीकडे बनत असताना कौन बनेगा करोडपतीने (कौ.ब.क.) सुखद धक्का दिला आहे. कौबकच्या हॉटसीटमधे बसलेल्या व्यक्ती शहरी कमी, गावा-खेड्यातील अधिक होत्या.

बीटाचे सुप

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 18/11/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ मध्यम आकारचे बीट साल काढून १ मध्यम आकाराचा टोमॅटो १ छोटा बटाटा साल काढून कोथींबीरीच्या कोवळ्या काड्या (तुम्ही सेलरी ही वापरु शकता) १ छोटा कांदा बारीक चिरून ३-४ लवंगा २-३ दालचिनीचे तुकडे २-३ तमालपत्र १ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार थोडीशी चिरलेली कोथींबीर २ टीस्पून तुप . पा़कृ: बीट, टोमॅटो, बटाटा व कोथींबीरीच्या काड्या उकडून घेणे.

चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 18/11/2011 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला. "आता हे नविन काय"? फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही. "कुणाला"? तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग? "चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय" न कळायला काय झाले? "हे ते १८+ वगैरे नाही ना."? नाही. ५५+ आहे. "पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर? बर झाल. माझ्या मागची पिडा टळली. "बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते. "ठीक आहे.

प्रथमोपचार पेटी - First Aid Box

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 18/11/2011 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमोपचार पेटी - First Aid Box प्रथमोपचार पेटीत काय काय असावे असा शोध आंतरजालावर घेतला. मराठीमध्ये असले काही आढळून आले नाही. मी काही औषधांची यादी केली आहे. यातील काही औषधे भारतात ओव्हर द काउंटर OTC मिळतात. (तसी सगळीच औषधे येथे मिळतात. ते चांगले की वाईट हा मुद्दा येथे नाही. गुण येण्याशी मतलब.) जाणकारांनी त्यात भर घालावी हि विनंती. १. Combiflam - ताप, अंगदुखी २. Crocin - ताप, डोकेदुखी ३. Disprin - डोकेदुखी ४. Alerid - D - सर्दीसाठी ५. Coldact - सर्दीसाठी ६. Cetrizane - सर्दीसाठी ७. Strepsil - घशात जळजळ ८. Pudin Hara - अ‍ॅसिडीटी ९. Eno - अ‍ॅसिडीटी १०. Gelusil - अ‍ॅसिडीटी ११.