ओन्जळीत पानी असताना,
म्रुगजळाला का फसु मी,
तहान तर भागत आहे,
मग उद्याची बात का करु मी.
दिवसा उजेड असताना,
अंधारात का चाचपडू मी,
रात्र होन्यास उशिर आहे
मग उद्याची बात का करु मी.
ताटात अन्न असताना,
आनंदाने का नाही खाऊ मी,
खाल्लेला घास हि न पचन्यास,
उद्याची बात का करु मी.
परिक्षा तर दिली आहे,
परिणामांची भीती का बाळगु मी,
परिक्षा ते परिणाम ह्या मधील दिन व्यर्थ जाण्या,
मग उद्याची बात का करु मी.
म्रुत्युची वेळ माहित नसताना,
म्रुत्यु समोर असल्याप्रमाणे का वागू मी,
जिवनही जगता न येण्यास,
मग उद्याची बात का करु मी.
येणार भविष्य हे वर्तमान होत असत,
मग प्रत्येक क्षण वर्तमानात का नाही जगू मी,
पण आ