१९६६, १९६७ अणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने..........
ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात आले व अशा रुग्णांकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची पद्धत रूढ झाली.
निद्रेचा तुरूंग. – स्वैर भाषांतर.
२० जुलै, बुधवार.
८.००
रक्तदाब घेण्यासाठी मला त्यांनी उठवले तेव्हा मला कळाले की मी स्वप्नात नव्हतो. हळुहळू माझ्या डोक्यात वास्तव शिरायला लागले. त्यांनी मला लगेच कपडे करायला सांगितले.