Skip to main content

50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 15/05/2022 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 15/05/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही वाट एकटीची ही वपु काळे यांची अगदी पहिलीच कादंबरी. या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे. ती तत्वनिष्ठ आहे, हट्टी आहे. ती कुणालाही न घाबरता स्वतःचे विचार परखडपणे मांडते.

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

लेखक अनिंद्य यांनी शनिवार, 14/05/2022 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
 फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers. जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे.

कथा : आमची गोष्ट

लेखक चष्मेबद्दूर यांनी शनिवार, 14/05/2022 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
शबिना: मी शबिना, माझ्या पोस्ट ग्रॅडच्या शेवटच्या वर्षात प्रेमात पडले मी आनंदच्या. आमच्या कॉलेजच गॅदरिंग बघायला आला होता, आमची ओळख वाढली आणि त्यानी लग्नाचं विचारल्यावर मी होकार देऊन टाकला. तो जोशी, मी तांबोळी! आमच्या पुढचा रस्ता काही फार सहज सोपा नसणार हे ठाऊक असून देखिल आम्ही सगळं निभवायच ठरवलं. माझ्या सासरी, आमचं लग्न म्हणजे एक मोठा धक्काच होता. त्यांच्या घरी माझ्या हातच पाणी देखील चालेल की नाही असं त्यांच्या वागण्या बोलण्यातून वाटत रहायचं. लग्नाआधीच्या दोन वर्षात फार वेळा नाही गेले मी त्यांच्याकडे, पण मनापासून कधी स्वागत नाही झालं माझं हेही तितकंच खरं. ते राहायचे शहराच्या मध्यवर्ती भागात.

'फेमिनिस्ट'

लेखक वेलांटी यांनी शनिवार, 14/05/2022 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट !! तिचं आजचं भाषण अतिशय गाजलं. कायक्रमाचा समारोप करताना आयोजकांनी अगदी भरभरून कौतुक केलं तिचं. त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव! ती स्वतःवरच जाम खूश झाली. एक धडाडीची फेमिनिस्ट म्हणून ती ओळखली जात होती. अतिशय धीट विचारांची होती ती. अल्पावधीतच तिने नाव कमावले होते. तिने नवर्याला कॉल केला. 'मी पार्किंगजवळ पोहोचतेय, लवकर ये'. वीस मिनिटे ती वाट बघत होती. एकदाचा तो आला. 'कुठे होतास? मी कधीची थांबलेय ईथे.' 'मग काय झालं? आलो ना? माझ्या फिल्डमधले लोक आले होते, त्यांच्याशी बोलत असताना तुझा मधेच कॉल!', त्याचा त्रासिक चेहरा. ती काहीच न बोलता गाडीत बसली.

मेथांबा

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 13/05/2022 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
कैरी म्हणजे माझ पाहिलं प्रेमच आहे .लहानपणी अशा तिखट मीठ लावून कैरी खायचे की समोर बघणाऱ्याचेच दात आंबायाचे.आता तर कलमी आंब्याच्या कैऱ्या अजिबात आंबट नसतात तेव्हा छान आंबट गोड लागतात.अगदी दुकानदार सुट्ट्या पैशांऐवजी कच्चा आंब चोकलेट(गोळी) द्यायचा ती पण मलाच दिली जायची ;) कैरीच लोणचे घातलं की आई बरणी लपवून ठेवायची ,नाहीतर कधी फडशा पडेल सांगता येत नसे.सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही पण माझ्यासाठे एक बरणी राखीव असते .साखर आंबा ,गुळांबा एवढा नाही आवडत.पण आता दिवेकरबाई डायटवाल्या यांनी सांगितल्या प्रमाणे गोड खाण्याची इच्छा झाल्यास गुळांबा हा सर्वात योग्य पर्याय आहे,कारण गुळाचे लोह तत्व शरीरास

शशक'२०२२- सामना

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 13/05/2022 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वचषकाचा अंतिम सामना ऐन रंगात आला होता. ह्याच्या संघाने मागील विश्वचषकात अंतिम सामन्यातच माती खाल्ली होती. समोरचा संघ पण खूपच चिवट होता, त्यांनी कधीच विषवचशक जिंकला न्हवता हा सामना त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण होता. आत्तापर्यंत सगळ्याच फलंदाजांनी गुढगे टेकले होते आणि धावांचा तर डोंगर पार करायचा होता. पण कप्तानाला साजेल असाच खेळ करून त्याने धावफलक सतत हलता ठेवला होता. आता केवळ ३ धावा १ चेंडूत हव्या होत्या. पण हाय देवा... जे व्हायचं तेच झालं, शेवटच्या चेंडूत हा झेलबाद झाला. तंबूत परतताना त्याच्या तोंडावर निराशा होती तरी त्याच्या बुकीला अंगठा दाखवायला तो विसरला न्हवता.

शशक'२०२२- पूर्णब्रह्म

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 13/05/2022 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
जेवायला वाढताना तिने नेहेमीप्रमाणे फ्रिज उघडला. सगळ्यांना ताजे अन्न वाढल्यावर सवयीप्रमाणे फ्रिझमधली कालची उरलेली खिचडी गरम करुन तिने फक्त स्वतःसाठी घेतली. तो नेहेमीप्रमाणे तिच्यावर चिडला. ताजे अन्न असताना मुद्दामुन शिळे अन्न संपवायची काय गरज? त्याच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न वाया गेलेले पाहवत नाही असे म्हणत तिने खिचडीचा घास तोंडात टाकला. ती मीटींग निमित्त दुपारीच परगावी गेली होती.दोन दिवसांसाठी. रात्रीचा स्वयंपाक त्याने स्वयंपाकीण बाईकडुन बनवुन घेतला. नेहेमीप्रमाणे त्याचा अंदाज चुकला.बटाट्याची भाजी प्रमाणापेक्षा जरा जास्तच झाली. तिने बजावुन ठेवल्याप्रमाणे त्याने उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवले. दुस