ए माझे संजीवनी,
तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा,
आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले
कधीच मी जिवा
ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या,
डोळ्यात पावलो सर्व जगा
तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी,
मी तुझा कायमच ग खुळा
वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले,
अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी.
अर्थातच हे गीत माझे नाही.
हा आविष्कार मात्र माझाच आहे.