Skip to main content

महाराष्ट्र पर्यटनात मागे का?

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 15/04/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपुर्ण होउ पहात असलेला उद्योग आहे.भारतातही हा उद्योग चांगलाच जम धरतोय्,मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत पर्यटनउद्योगात उदासीनता मोठ्या प्रमाणात आढळुन येते. वास्तविक महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड विविधता आहे.

सावज !

लेखक चाफा यांनी रविवार, 15/04/2012 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
`स्नायपर शिंदे शुद्धीवर आलाय ताबडतोब हेड ऑफिसला पोहोचणे' हातातल्या त्या तारेचा आशय नक्की मला कळतोय तोच असल्याची मी चार-चारदा खात्री करून घेतली. अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसणं सोपं वाटत नव्हतं. गेल्या दशकातलीच गोष्ट आहे ही, आसामच्या जंगलात नाईलाजास्तव सैन्य तैनात करावं लागलं होतं, एकमेव कारण बोडो अतिरेकी. सुरुवातीला वाटलं त्यापेक्षा जास्त उपद्रव द्यायला त्यांनी एव्हाना सुरुवात केली होती, भले भले ऑफिसर्स त्यांच्या घातपाती कारवायांना बळी पडत होते. आसामच जंगल म्हणजे काळ बनलं होतं आणि अश्यावेळेस मी माझ्या साथीदारांसह तिथे तैनात केल्या गेलो होतो.

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा

लेखक यनावाला यांनी रविवार, 15/04/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा "प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्‍ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले.

एक कविता हरवलेली ... सापडली :)

लेखक मस्तानी यांनी रविवार, 15/04/2012 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना. शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित.

!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 15/04/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!! हे नेहमी अस्स्सचं का होतं जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं.. भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ.. Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range 1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change.... दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी' Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'.... 5 रु .

कुलरची खरेदी

लेखक प्राध्यापक यांनी शनिवार, 14/04/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
एअर कुलर ची खरेदीच नियोजन घरात बर्‍याच दिवसापासुन चालल होत, होता येइल तेव्हड मी खरेदि टाळण्याचा प्रयत्न करत होतो,कारण एकच मार्च अखेर मात्र जसजस उन्हाची काहीली वाढु लागली तसं घरातल तपमान आणी अबोला दोन्हीही एकदमच वाढु लागलं नाइलाजाने दोन चार मित्रांकडुन उसन वारी करुन आर्थिक गणित कसबस जमवल आणी मध्यम वर्गीय प्रथांनुसार दुकानांमधे कुलरची माहीति काढायला सुरुवात केली . लवकरच जाणवल हे प्रकरण वाटत तेव्हढ सोप नाही . मित्रांकडुन माहीती काढायला प्रारंभ केला,एकानं सांगीतल कुलर घेताय ना?मग लोकल कंपनीचाच घ्या,ते ब्रँडेड कंपनी वाले फार लुटतात हो?

पौराणिक विमाने

लेखक आनन्दा यांनी शनिवार, 14/04/2012 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/… अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि.

बाजार स्वप्नांचा!

लेखक वेणू यांनी शनिवार, 14/04/2012 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वप्नांचा बाजार" नाव वाचताच रहावलं नाहीच, आत डोकावून पाहण्याचा मोह आवरला नाहीच गेला. एका छान निळसर प्रवेशद्वाराला ताज्या- टवटवीत फुलांच्या माळांनी सुशोभित केले होते. त्या द्वारावर ही पाटी होती... आत बरीचशी माणसं दिसत होती..घड्याळ्याकडे लक्ष गेलं रात्रीचे ११ वाजत आले होते, त्या बाजाराच्या सुशोभित द्वारावरच यात येण्याच आवाहन होतं...! धुंद व्हावं, हवेवर अगदी तरंगावं असा मोहक गंध पसरलेला होती आत सर्वत्र.. अगदी प्रचंड रोषणाई चहुकडे ...

मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : एक तौलनिक अभ्यास

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 14/04/2012 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
`मिथक' हे `चिऊ आणि काऊ' वरून सरळसरळ उचलंय असं अवलोकन आहे तरी जाणकारंनी योग्य तो पाहुणचार करावा अशी नम्र विनंती मिथक : चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला.

विव्हळून ..

लेखक तिमा यांनी शनिवार, 14/04/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: गविंना सलाम करुन (कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते) उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या. पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो .... नवीन पिढीची चव नासवून टाकतात भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........ नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!