Skip to main content

डिस्को-क्वीन - डॉना समर

लेखक प्रास यांनी सोमवार, 21/05/2012 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल नेट वर फेरफटका मारताना अचानक बातमी वाचली, डॉना समरच्या मृत्यूची आणि मन भूतकाळात मागे गेलं, बर्‍यापैकी मागे, पार ८५-८६ सालामध्ये. तेव्हा अस्मादिक कुठेतरी पाचवी-सहावीमध्ये असतानाची गोष्ट. आमचे बंधुराज आमच्याहून पाच वर्षांनी मोठे. त्यावेळेस ते कॉलेज-कुमार बनून त्यांचा सोनेरी काळ जगत होते नि आम्ही शाळेत स्वतःचं आयुष्य फरफटवत होतो.

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 21/05/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा 'देवदास' आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती. 'पण मला तर आवडला बुवा' एक कन्या म्हणाली. 'काय आवडले तुला?' असा प्रश्न विचारताच 'कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.' कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही मिनिटे भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला.

((अलगद कापला कराने गळा.)) विडंबन

लेखक रामजोशी यांनी सोमवार, 21/05/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
कापला रेशमाच्या सुताने गळा जाणवू ना दिल्या वेदना ना कळा अलगद कापला कराने गळा. घेतला आळ नाही पवारांवरी त्यांच्या आडून खाल्ले मी हजारवेळा मागून शिव्या दिल्या खरे हे जरी का खाखाकार वाचूनी मी लुळापांगळा राहतो मी येथे, दिसतो मी बावळा सापडेना कुणा इरसाल मी खरा.

झालरी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 21/05/2012 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
झालरी वसने तरूंची मूक त्यांची स्नेहभाषा जाणिवांच्या भावरंगी उन्मनी एकच दिशा जे मिळे तेथेच देई अंबरी पायातही गूढ नाते या चराशी अंतरी हळवी नशा कोष गाभ्याचे कळे ना कोण विणतो साखरी अंशकण मजला मिळावे आळवे निज वैखरी ..............................अज्ञात
काव्यरस

कापला रेशमाच्या सुताने गळा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/05/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
.
.
--------------------------------------------------------
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी - ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
---------------------------------------------------------
.
.