Skip to main content

डास व त्याचे चावणे

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका. डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.

एक पत्रकथा: संपूर्ण (अंतिम भागासहित)

लेखक वेणू यांनी शनिवार, 09/06/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जून १९९१ आदरणीय (की प्रिय?)__, संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. असो. हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय...

विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 09/06/2012 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि बुद्धिवाद प्रकरण 2
विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे
प्रकरणाचे शीर्षक वाचून कोणाला ही असे वाटण्याची शक्यता आहे की, विज्ञानातही चमत्कार आहेत आणि चमत्काराचे ही विज्ञान आहे असे असेल तर ज्या विज्ञानात चमत्कर आहेत त्याला विज्ञान कसे म्हणावे व ज्या चमत्कारांचे विज्ञान आहे त्याला चमत्कार कसे म्हणावे असा साहजिकच प्रश्न उपस्थित होईल.

टॉमची सॅंडविच

लेखक Maharani यांनी शुक्रवार, 08/06/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ४ ब्रेड स्लाइस ३/४ लसूण पाकळ्या बारीक चिरून २ मध्यम आकाराचे टोमॅटो (मिक्सर मधे प्युरी करून) १ लाल सुकी मिरची चुरडून २ चीज़ स्लाइस मीठ चवीनुसार चिमूटभर साखर मिक्स हर्ब्स (असल्यास) २/३ तुळशीची पाने (असल्यास) कृती :- १) पॅन मधे तेल घेऊन गरम करायला ठेवा. २) त्यात चिरलेला लसूण घाला व परता. ३) त्यात टोमॅटो प्युरी घाला व थोडे घट्ट होई पर्यंत व रंग किंचित गडद होईपर्यंत परता. ४) त्यात मीठ,साखर,चुरडलेली लाल मिरची,हर्ब्स,तुळशीची पाने तोडून टाका.

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 08/06/2012 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 08/06/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

असाही एक Near Death Experience

लेखक संपत यांनी शुक्रवार, 08/06/2012 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज Near Death Experience वरचा लेख वाचून माझ्या लहानपणी घडलेला एक किस्सा आठवला. माझे मुळ गाव अलिबाग.. कोकण पट्टयात असल्याने भूतखेते भरपूर. पण सर्वाधिक भूतांचा प्रदेश म्हणजे मुरुड जंजिरा. तिथे चिंचेच्या झाडावर एक दगड भिरकावला तर चार चिंचा आणि दहा भुते पडायची.. तिथे माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांकडे घडलेली ही घटना.. तर ह्या शेजाऱ्यांचा बाबू नावाचा मुलगा चित्रपटांचा भारी शौकीन. त्यावेळी रात्री रस्त्यांवर पडदे टाकून चित्रपट दाखवले जात. शौकीन लोक चांगला चित्रपट फुकटात बघायला लांब लांब जायचे. असाच एकदा मे महिन्यात 'कुर्बानी' चित्रपट पाहायला हा बाबू गेला. रात्री यायला उशीर झाला.