Skip to main content

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

मिंट मॅजीक

लेखक jaypal यांनी गुरुवार, 05/07/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडली, नावा वरुन कळलच असेल या रेसीपीत मिंट (पुदिना) महत्वाचा घटक आहे.

खंड कपारी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 05/07/2012 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात
काव्यरस

पिंकी प्रामाणिक

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 05/07/2012 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर त्निने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. खरे तर पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्‍या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आनि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे.

आरसा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/07/2012 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली. यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो. मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत? तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना. तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते.

किल्ले भोरगिरी - परसबाग उपक्रमाची पहिली पायरी

लेखक जातीवंत भटका यांनी बुधवार, 04/07/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधी परसबाग उपक्रमाविषयी थोडं सांगतो. गेल्या १६ वर्षांतील माझ्या भटकंतीत अगणित वेळा किल्ल्यांच्या गावांत, घाटमाथ्यावरच्या, तळकोकणातल्या वाड्यां-वस्त्यांवर, धनगरपाड्यावर तर कधी कोण्या ठाकरवाडीत मुक्काम ठोकले आहेत. त्यांच्या घरी अनेकदा त्यांच्या मांडीला मांडी लावून यथेच्छ जेवलो आहे. या सगळ्यात माझ्या एक गोष्ट ध्यानी आली, ती म्हणजे यांच्या जेवणात मुख्यत्वे भात, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी आणि भाकरीबरोबर खायला फक्त ठेचा किंवा खरडा आणि डाळ किंवा पिठलं. आहारात हिरव्या भाज्यांचा लक्षणीय अभाव ! मग या अभावाची प्रमुख कारणं शोधली. बाजारपेठ लांब असल्यामुळे ताज्या भाज्या फक्त आठवड्याच्या बाजारालाच मिळंत.

गँग्ज ऑफ वासेपुर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 04/07/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.