राज ठाकरे यांचा विराट मोर्चा व सभा
राज ठाकरे यांनी आज एक अभूतपूर्व असा प्रकार करुन दाखवला आहे. त्यांचा मोर्चा व त्यानंतर झालेली सभा ही खरोखरच विराट होती. मोर्चाआधीच, त्याबद्दल शंकाकुशंका काढणार्या नतद्रष्ट प्रवृत्तींना, त्यांनी जे भाषण केले त्यांत, खणखणीत उत्तर दिले आहे. ११ ऑगस्टला झालेला प्रकार हा सगळ्याच देशप्रेमी माणसांना अस्वस्थ करुन सोडणारा होता. आणि त्यावर शासनाचा नाकर्तेपणा हा तर, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पोलिसही झाल्या प्रकाराने नाराज झाले होतेच. आजच्या या यशस्वी दणकेबाज उत्तरानंतर शासनाची सुस्ती थोडी उतरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
राज ठाकरे यांच्यावर मी अनेकदा टीका केली आहे.
मिसळपाव