Skip to main content

उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/11/2012 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या सरहद्दीजवळ उडत्या तबकड्यांचे गूढ आणि सैन्य दलातील भोळसटपणा उडत्या तबकड्या किंवा आकाशात (बातमी नुसार) 3 ते 5 तास तरंगत राहणाऱ्या त्या अज्ञात वस्तू वस्तुतः मानवी मनाचे खेळ असतात. अशा खोट्या वस्तूंचे अस्तित्व भारतीय लष्कराने मान्य करणाऱे रिपोर्ट्स वरिष्ठांना पाठवले ही बातमी वाचून भारतीय सैन्य दलात अजूनही किती अंधश्रद्धा आहेत याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळते. बातमी नुसार संरक्षण खात्यातील वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थांना देखील 'काय आहे काही सांगता येत नाही' असे म्हणावे लागणे म्हणजे विज्ञानिक दृष्टीला आव्हान आहे.

धन्य ते गायनी कळा..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 06/11/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! ) या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से. मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे.

कणकेचे लाडू

लेखक Pearl यांनी मंगळवार, 06/11/2012 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अत्यंत आवडते लाडू. पोटभरीचे, चविष्ट आणि पौष्टीकसुद्धा. बच्चेकंपनी हे लाडू खाउन खूप खूष होते. साहित्यः १ कप गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल) कृती: १) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता. २) ५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या. ३) गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या. ४) मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा.

मोहनथाळ

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 05/11/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी स्पेशल!! साहित्यः जाडसर दळलेले बेसन पाव किलो, साजूक तूप पावणे दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, थोडेसे दुध, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम काप सजावटीसाठी, चिमुट्भर केशर अगर केशरी रंग. क्रुती: प्रथम बेसन एका परातीत घ्यावे. दोन चमचे तूप गरम करून त्यात घालावे. थोडया दुधाचा हबका मारावा. पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर पाच मिनिटानी रव्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. कढईत बाकीचे तूप घेवून, त्यात बेसन घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. दुसय्रा पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा.

स्कायफॉल-

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 05/11/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

यशोमति मैयासे बोले नंदलाला

लेखक शरद यांनी सोमवार, 05/11/2012 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
यशोमती मैयासे बोले नंदलाला " श्रीकृष्ण हा जगद्गुरू खरा, त्याने गीतेमधून सर्व उपनिषदांची सार काढले हेही खरे पण भारतातल्या निम्या लोकांना, स्त्रीवर्गाला, त्याचे काही कौतक नाही. त्यांना ते माहितही नसेल. त्याने कंसाला मारले, पांडवांना मदत करून कौरवांना हरवले हे त्यांना माहीत असले तरी "ते देवाचे कामच आहे" अशी संभावना केली जाईल. त्यांच्या दृष्टीने कृष्ण एकच, "बाळकृष्ण". रांगत रांगत येऊन वडीलांच्या ताटातला घास त्यांनाच भरविणारा, मडके फोडून लोणी पळवणारा, गोकुळातील सर्वांचा लाडका, सावळा बाळकृष्ण. आपल्या घरांत रांगणार्‍या मुलाकडे कौतकाने पाहणार्‍या आईला तिथे दिसत होता तो बाळ्कृष्णच.

पुराना मंदीर और पुरानी यादे ( बालपणीच्या आठवणी )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी सोमवार, 05/11/2012 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हेलोवीन होता. अमेरिकेत तर निसर्ग चेटकीण , भुतांच्या स्वरुपात प्रत्येक अमेरिकावासियांच्या दारावर उभे ठाकले आहे. जर्मनीत ह्या सणाचे विशेष महात्म्य नाही. पण माझे मन मला माझ्या बालपणीच्या आठवणी मध्ये रमले. भुतांच्या गोष्टी आजी , आजोबा ह्यांच्या कडून ऐकल्या गेल्या. माझा पिंड भुतांच्या गोष्टीवर बालपणी पोसल्या गेला. आमच्या सोसायटी मध्ये गच्चीवर भाड्याने विडीयो आणून ३ सिनेमे सलग पाहण्याची परंपरा कोजागिरीच्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने सुरु झाली.

राजकारण: एक आठवण

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 04/11/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे. मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला).

इंगलिश विन्गलिश...

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 04/11/2012 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
इंगलिश विन्गलिश... इंग्रजी विंग्रजी.... काय असतं बुवा हे ? लहानपणापासून इंग्रजीला घाबरणारे कितीकसे पाहिलेत ! निरनिराळे अनुभव आपल्यालाही अनेकविध अंगांनी आले असतीलच.. बेशक.......शाळा, कोलेज, कार्यालय वगैरे......हो हो आठवा ते अनुभव.... रम्य ते दिवस, अनुभव, मित्रांसोबत केलेली मजा, नीट इंग्रजी न आल्याने कित्येकांची उडणारी भंबेरी आपण पाहिली, खिल्ली उडवली, पोटं दुखेस्तोवर हसलो वगैरे. इथे तर नेमकं 'आर बाल्की' निर्मितीने तर आपल्या सारख्यांच्या घरचंच उदाहरण घेऊन कदाचित सिनेमा बनवलाय असं वाटतंय... "इंगलिश विन्गलिश"..